Diesel Confusion In Ratnagiri 
कोकण

वाचा रत्नागिरीत का झाला डिझेलचा गोंधळ ..?

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  एसटी आगारात रात्री डिझेल टॅंकर येऊनही तो उतरवून घेण्यात आला नाही. त्यामुळे आज सकाळी गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी गर्दी झाली. यामुळे आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण व शहरी फेऱ्या सुटू शकल्या नाहीत. ग्रामीणच्या 136 आणि शहरी 134 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याचा फटका शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांना बसला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आगारात सुरू होती. 


सकाळी गाड्यांची एकदम गर्दी झाल्यामुळे माळनाका मुख्य रस्त्यावरही एसटी गाड्या रांगेत उभ्या होत्या. सकाळी 6 नंतरच्या काही फेऱ्या सुटल्या. तसेच रात्री वस्तीवरून आलेल्या फेऱ्यांनी ग्रामीण फेऱ्या मारल्या. ग्रामीणच्या तीन हजार 600 कि.मी. व शहरी एक हजार 200 कि.मी. रद्द झाले. रत्नागिरी विभागाला सुमारे 40 कोटींचा तोटा आहे.

लाखो रुपयांचे नुकसान

गेले काही महिने अपुरे डिझेल, पैसे नसल्यामुळे कंपन्यांची देणी, पगार कपात आदी कारणांमुळे एसटी विभाग सातत्याने चर्चेत आहे. डिझेलबाबत माहिती घेतली असता, काल रात्रीच डिझेलचा टॅंकर आला होता. मात्र, नियमानुसार तो उतरवून घेण्यात आला नाही. परंतु आज सकाळी ग्रामीण व शहरी फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कार्यवाही न झाल्याने गोंधळ 
डिझेलचा टॅंकर आल्यानंतर अन्य एका अधिकाऱ्याने तो उतरवून घेण्यास सांगितले होते, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच हा गोंधळ झाला. नियमानुसार रात्री टॅंकरमधून डिझेल पुरवठा स्वीकारला जात नाही. मात्र, अडचणीच्या काळात ते वरिष्ठांच्या परवानगीने उतरवून घेता येतो. परंतु असे न झाल्यामुळे आज प्रवाशांना फटका बसला. 

दंडात्मक कारवाई होणार का? 
रत्नागिरी आगारातील वरिष्ठ अधिकारी प्रत्येक अपराधासाठी मिळेल. त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून थेट दंडात्मक कारवाई म्हणून 100 ते 500 रुपये कपात करत आहेत. यासंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये भरपूर नाराजी आहे. त्यामुळे आजच्या डिझेल गोंधळामुळे जेवढ्या फेऱ्या रद्द झाल्या, त्याची नुकसानभरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून करण्यात यावी, अशी मागणी काही कर्मचाऱ्यांनी केली. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT