diesel theft sakal
कोकण

चिपळूण : रिक्त पदांमुळे मुक्त डिझेल चोरी!

रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकमेव अभियंता; १७ पदे रिक्त

मुझफ्फर खान

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यामधील गाळ काढण्याचे काम अलोरेतील यांत्रिकी विभाग करत आहे. या विभागाकडे पुरेसे अभियंते नाहीत. कोयनेतून कामगिरीवर आणलेल्या एका सहायक अभियंत्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्याने कुठे कुठे लक्ष द्यावे, असा प्रश्न आहे. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात डिझेलचा भ्रष्टाचार सुरू असल्याची ओरड होत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी दरम्यान यांत्रिकी विभागाची अशी अपंगता समोर आली.

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम यांत्रिकी विभागाकडून सुरू आहे. या कामात नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून डिझेलमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांनी डिझेल परस्पर विकले. ही बाब समोर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर यांत्रिकी विभागाने तीन कंत्राटी कामगारांना निलंबित केले. डिझेल विकणारे कंत्राटी कामगार होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे अभियंते नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे यांत्रिकी विभागाकडून सांगितले जात आहे.

परिस्थितीचा घेतात गैरफायदा

यांत्रिकी विभागात शाखा अभियंता पदाची १९ पदे मंजूर आहेत. यातील १७ पदे रिक्त आहेत. दोन शाखा अभियंत्यांपैकी एकाकडे कोळकेवाडी धरण आणि दुसऱ्याकडे कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी आहे. गाळ काढण्याचे काम पाहण्यासाठी तिसरा अभियंता नाही. त्यामुळे कोयना नगर येथील शाखा अभियंत्याची अलोरे येथे कामगिरीवर नियुक्ती केली आहे. त्याला कोयनेसह रत्नागिरी जिल्ह्यातील गाळ काढण्याच्या कामावर लक्ष ठेवावे लागत आहे. एकच अभियंता जिल्ह्याचा कारभार सांभाळत आहे. त्याला सर्व ठिकाणी लक्ष ठेवता येत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेत चालक डिझेलची चोरी करत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे फावते

अलोरे येथील यांत्रिकी विभागाकडे वाशिष्ठी नदीसह खेड, रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, देवरूख येथील नद्यामधील गाळ काढण्याचे काम सोपवण्यात आले आहे. शासनाकडून इंधन खर्च मंजूर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Walkout : शेतकरी प्रश्नावर अधिवेशनात गोंधळ, विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांनी थातूर मातूर उत्तर दिल्याचा आरोप

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अंमलबजावणी करा; साताऱ्यात विविध संघटना आक्रमक, धर्मांतर प्रकरणांवर कठोर कायदा आणा!

International Mountain Day 2025: आयुर्वेदाचा खजिना पर्वतातच लपलेला! निसर्गोपचारासाठी जाणून घ्या पर्वतांचे महत्त्व

Pune Municipal Election : शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी; महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर

Viral video: लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ‘तो’ क्षण पकडला, पाकिस्तानी जनरलने महिलेसोबत नेमकं काय केलं? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT