Different Activity Of Water Distribution In Masure Magvane 
कोकण

मसुरे मागवणेत पाण्यासाठी `हा` आगळा वेगळा उपक्रम 

सकाळवृत्तसेवा

मसुरे ( सिंधुदुर्ग ) - सर्वत्र सामाजिक भावना आणि समाजसेवा आज लुप्त होत असतानाच मसुरे मागवणे येथील डॉ. अनिलकुमार वैद्य यांच्या लॉर्ड बहुउद्देशीय संस्थेने समाजासमोर आपल्या उपक्रमाने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मेमध्ये मसुरे मागवणे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी अखेर डॉ. वैद्य यांच्या बहुउद्देशीय संस्थेमार्फत या भागातील ग्रामस्थांना एक दिवस आड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा प्रारंभ मागवणे येथे जिल्हा परिषद सदस्य सरोज परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

डॉ. अनिलकुमार वैद्य त्यांची लोर्ड बहुउद्देशीय संस्था ही विविध सामाजिक उपक्रमात राज्यभर काम करत आहे. मसुरे मागवणेवाडी येथील कार्यरत असलेली नळपाणी योजनेचे पाणी मेमध्ये पूर्ण कमी होते. तसेच इथे असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याअभावी मोठे हाल होतात. या समस्येची जाणीव असलेल्या डॉ. वैद्य यांनी मागवणे ग्रामस्थांना सोबत घेऊन पाणी उपलब्ध करून देण्याची एक कल्पना सत्यात उतरवली.

डॉ. वैद्य अध्यक्ष असलेल्या लॉर्ड बहुउद्देशीय संस्थेमाफत एक दिवस आड दुसरीकडून टॅंकरने पाणी आणून या नळपाणी योजनेच्या टाकीमध्ये पाणी शिफ्टिंग करण्यात येणार आहे. येथील ग्रामस्थांना एक दिवस आड पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था या संस्थेने, ग्रामस्थांनी केली आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणावरून पाणी आणून पुन्हा नळपाणी योजनेचे पाणी सोडून नळपाणी योजना अंमलात आणण्याचा अभिनव उपक्रम या गावात प्रथमच होत आहे. गेल्या अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न यावर्षी बहुउद्देशीय संस्थेने आणि येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे सुटणार आहे. 

डॉ. वैद्य म्हणाले, ""आपण व आपली संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना समाजासाठी जे जे काही चांगले करता येईल त्यासाठी आमची संस्था नेहमी सहकार्य करेल. आपली पत्नी स्वर्गीय अपर्णा वैद्य यांनीही हा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पाठपुरावा केला होता."" 

सौ. परब म्हणाल्या, ""कठीण काळात डॉ. वैद्य त्यांचे सर्व सहकारी, बहुउद्देशीय संस्था, मागवणे ग्रामस्थ यांच्यामाफत स्थानिक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत चांगला उपक्रम राबविला आहे. त्यांचा हा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. ग्रामस्थांना जे सहकार्य लागेल ते जिल्हा परिषद स्तरावरून देऊ.'' 

संस्थेचे उपाध्यक्ष कपिल नाबर, पंढरीनाथ कुलकर्णी, शिवाजी परब, राजन परब, महेश कुलकर्णी हे उपस्थित होते. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी विकास बागवे, रुपेश दुखंडे, श्‍याम चव्हाण, श्रीकांत सावंत, तेजस चव्हाण, अजित दुखंडे, दीपेश दुखंडे, अमरेश सावंत, श्रीकांत सावंत आणि मागवणे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT