digital online satbara available for people 99 percent work done in rajapur ratnagiri 
कोकण

डिजिटल सहीचे सातबारा आता मिळणार कुठेही ; ९९ टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागातर्फे हाती घेतलेले सातबारा उतारा संगणकीकरण करण्याचे तालुक्‍यातील सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुकावासीयांना आता लवकरच ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहेत.

जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा पुरावा म्हणून सातबारा उताऱ्याला महत्त्व आहे. अनेक वेळा तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. लोकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन शासनाने २०१३ पासून महसूल व वन विभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण ई-फेरफार कार्यक्रम संपूर्ण राज्यात हाती घेतला आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाईन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतरही अनेक ऑनलाईन सातबारामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने जमीनमालकांना असे चुकीचे सातबारे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे सातबारा ऑनलाईन 
प्रक्रियेत झालेल्या चुका सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने सातबारा ऑनलाईनचे काम हाती घेण्यात आले. 

मंडल अधिकाऱ्यांसह तलाठ्यांच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या जागा असताना प्रांताधिकारी प्रवीण खाडे, तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी, तलाठी आदींनी सातबारा उतारा ऑनलाईन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 

एक टक्का काम आठवड्यात पूर्ण होणार

दरम्यान, उर्वरित केवळ एक टक्का काम शिल्लक असून ते सातबारा उताऱ्यावरील तांत्रिक अडचणींमुळे रखडले असून येत्या आठवडाभरामध्ये पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दृष्टिक्षेपात राजापूर

  •  तालुक्‍यात २३७ महसुली गावे, १२ मंडळे
  •  तुलनेमध्ये कर्मचारी संख्या अजूनही अपुरी 
  •  सातबारा ऑनलाईनच्या कामावेळी तारेवरची कसरत 
  •  ३ लाख १५ हजार ५२५ सातबारा उतारे
  •  एकूण उताऱ्यांपैकी ऑनलाईनचे ९९ टक्के काम पूर्ण 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT