कोकण

चालक-वाहकांना काम देताना भेदभाव

CD

M87520

चालक-वाहकांना
काम देताना भेदभाव

‘कामगर सेना’ ः एस.टी. अधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.३ : एस.टी. चालक आणि वाहकांची ड्युटी लावताना भेदभाव करू नये. सर्व कर्मचाऱ्यांना सारख्याच प्रमाणात ड्युटी दिली जावी यासह इतर अनेक मागण्यांबाबत एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील एस.टी. अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कणकवली आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत कामगार सेनेचे कोकण विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी व तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड व बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कामगारांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली.
या चर्चेत चालक, वाहकांच्या ड्युटीबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. चालक, वाहकांना ड्युटी देताना एस.टी. अधिकाऱ्यांकडून भेदभाव केला जातो. मूळ वेतन कमी असलेले अनेक चालक आणि वाहक जादा काम करण्यास तयार असतात. परंतु, त्‍यांना जादा काम दिले जात नाही. तर काही मर्जीतीलच चालक आणि वाहकांना जादा काम दिले जाते असा आरोप श्री.धुरी आणि श्री.मालंडकर यांनी केला. याखेरीज ज्‍येष्‍ठ आणि अनुभवी चालक आणि वाहकांसाठी पूर्वीप्रमाणेच वेगळा ग्रुप केला जावा. हंगामी चालणाऱ्या बसेससाठी वेगळा ग्रुप तयार करून सर्व चालक आणि वाहकांना समान काम दिले जावे. कामाचे तास निश्‍चित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्‍या अधिकाऱ्यांना समज दिली जावी आदी अनेक मुद्द्यांवर कामगार सेना पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी कामगार सेनचे महेश कोदे, श्री.तेली, श्री.तारी, श्री. गिते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळे यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी; दिवाळी किट वाटपावरून वाद!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT