diseases konkan sindhudurg district 
कोकण

आधी कोरोना...अन् आता हे...सिंधुदुर्गवासीयांनो घ्या काळजी!

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - पावसाळ्याचा हंगाम किटकजन्य आजारासाठी जोखमीचा असल्याने आरोग्य विभागामार्फत 1 ते 30 जून हा संपूर्ण महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जात आहे. या कालावधीत किटकजन्य आजार रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपायोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत हिवतापचे 2 तर डेंगीचे 20 रुग्ण आढळल्याने आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती हिवताप विभागाकडून देण्यात आली. 

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या आजाराचा प्रामुख्याने समावेश होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या समन्वयाने या कार्यक्रमाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार पावसाळ्याचा हंगाम हा किटकजन्य आजारासाठी जोखमीचा असल्याने एक ते 30 जून हा संपूर्ण महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.

या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सतर्क करून जिल्ह्यात विविध उपाययोजना आखल्या आहेत. जून महिन्यामध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास होते. या डासांमुळे हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया सारख्या किटकजन्य आजारांचा फैलाव होतो. किटकजन्य आजारात वाढ होऊ नये, यासाठी डांस निर्मिती रोखणे गरजेचे आहे. गतवर्षी जिल्ह्यात डेंगीचे 124 रुग्ण व हिवतापाचे 38 रुग्ण आढळले होते. त्यात हिवतापाने एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता. ही बाब लक्षात घेता खबरदारीच्या उपाय योजनेसाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

कोणताही ताप हा हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया असू शकतो हे लक्षात घेऊन ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात रक्त तपासून घ्यावे. आरोग्य यंत्रणेकडून दिलेले निर्देश आणि सूचनांचे पालन करून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन हिवताप विभागामार्फत करण्यात आले आहे. 

जनजागृती करणार 
जनतेमध्ये जागृती व्हावी तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये जनतेचा सहभाग मिळावा, या उद्देशाने महिनाभर योग्य खबरदारीसह विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात हिवतापाचे 2 तर डेंगीचे 20 रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचा सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT