Dissatisfied with the administration for not making a decision in malvan sindhudurg 
कोकण

"त्या' एलईडींना जबाबदार कोण...? निर्णय होत नसल्याने प्रशासनावर नाराजी 

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : दांडी व कोळंब समुद्रकिनारी वाहून आलेले हंडी आकाराचे तीन एलईडी बल्ब पोलिसांनी संशयास्पद वस्तू म्हणून पंचनामा करून ताब्यात घेतले; परंतु एलईडी बल्ब बेकायदेशीररित्या होणाऱ्या पर्ससीन नेट मासेमारीसाठी वापरले जात असल्याने हे बल्ब मत्स्य विभागाची जबाबदारी असल्याची भूमिका घेत पोलिसांनी हे तिन्ही बल्ब मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले होते. मात्र त्यानंतर सापडलेले बल्ब "समुद्री कचरा'च झाले. त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी करत आहेत. 


आतापर्यंत दांडी येथे दोन, कोळंब आणि वायरी जाधववाडी समुद्रकिनारी प्रत्येकी एक, असे चार तर दांडी आवारवाडी येथे पाण्याखाली सोडला जाणारा 4 हजार वॅटचा एक, असे एकुण पाच बल्ब आढळले होते. पैकी दांडी व कोळंब येथे घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून एलईडी बल्ब ताब्यात घेतले होते. परंतु एलईडी बल्बचा वापर बेकायदेशीर मासेमारीसाठी होत असल्याने पोलिसांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हे बल्ब सुपूर्द केले होते. हे तिन्ही बल्ब मत्स्य विभागाच्या कार्यालयात जमा आहेत.

 मात्र गेले दोन दिवस दांडी आवारवाडी व वायरी जाधववाडी येथील समुद्रकिनारी सापडलेले एलईडी बल्ब ताब्यात घेण्यासाठी पोलीस किंवा मत्स्य विभागाने तत्परता न दाखविल्याने वाहून येणारे एलईडी बल्ब समुद्री कचरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलईडी बल्ब ही सागरी सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू नसल्याचेही शिक्कामोर्तब झाले आहे. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरूवातीला वाहून येणारे एलईडी बल्ब समुद्री कचराच असल्याचे स्पष्ट करीत ते ताब्यात घेण्यास नकार दिला होता. परंतु नंतर पोलिसांपुढे नमते घेत तीन बल्ब आपल्या कार्यालयात जमा केले होते. 

  
सागरी संवर्धनवाले लक्ष देणार का? 
पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर म्हणाले, ""जेव्हा एलईडी बल्ब समुद्रकिनारी वाहून आले तेव्हा आम्ही पोलिसांना माहिती दिली. मत्स्य विभागालाही कळविले; परंतु आता जर शासकीय यंत्रणा हे एलईडी बल्ब ताब्यात घेणार नसेल तर "समुद्री कचरा' म्हणूनच ते गोळा करणार आहोत. खंत याच गोष्टीची आहे, की एलईडी दिव्यांचा कचरा कशामुळे होत आहे हे माहिती असूनसुद्धा सागरी पर्यावरण संवर्धन व जतनाच्या बढाया मारणारे शासनाचे संबंधित विभाग मूग गिळून गप्प आहेत. केंद्र व राज्य शासनाने बंदी घालूनसुद्धा एलईडी मासेमारी होत आहे. यामुळे जलचरांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्याबाबत संशोधन करण्याची मागणीही कांदळवन विभागाने कुंभारमाठ येथे आयोजित कार्यशाळेत केली होती.''  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT