कोकण

पिंगुळीत दिव्यांगांना जयपूर फुटचे वितरण

CD

88800

पिंगुळीत दिव्यांगांना ‘जयपूर फूट’चे वितरण

अण्णा राऊळ महाराज ट्रस्टचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः सद्‌गुरू समर्थ विनायक अण्णा महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राऊळ महाराज समाधी मंदिर, पिंगुळी येथे दिव्यांग रुग्णांना ‘जयपूर फूट’चे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराचा ४७ जणांनी लाभ घेतला. रुग्णोपयोगी साहित्य वितरण केंद्र समिती, कुडाळ आणि रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.
सद्‌गुरू समर्थ राऊळ महाराज मठ, पिंगुळी येथे जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यासाठी पायांचे मोजमाप शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्‌घाटन अण्णा महाराज यांच्या पत्नी श्रीमती संगीता ऊर्फ बाईमा यांच्या हस्ते झाले. यावेळी सद्‌गुरू राऊळ महाराज संस्थानचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त अशोक कदम, महादेव पांगे, विनय पाटील, नारायण राऊळ, रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूरचे व्यवस्थापक तानाजी चव्हाण, रुग्णकल्याण समिती प्रमुख महेश कुडाळकर, श्रीधर गोरे, उमेश वैद्य, प्रताप खामकर, सूर्यकांत सराफदार, मोतीराम प्रभू, सचिव राजन पांचाळ, प्रसाद दळवी, प्रकाश पिंगुळकर, मधुकर जोशी, दीपक मालाडकर, प्रकाश गुरव, समीर प्रभू, अंजली मुतालिक यांचे सहकार्य मिळाले.
या शिबिरामध्ये लाभार्थी दिव्यांगांना ‘जयपूर फूट’चे मोफत वाटप करण्यात आले. या वर्षी ‘हाय एचडीपीई’ या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले कमी वजनाचे आणि १५० किलो वजन घेणारे जयपूर फूट दिव्यांगांना देण्यात आले. यासाठी डॉ. नवांगुळ (कुडाळ) यांचे सहकार्य मिळाले. सिंधुदुर्ग व गोवा भागातील रुग्णांना जयपूर फूट बसविण्यात आले. या उपक्रमास २०१६ पासून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे कोषाध्यक्ष दशरथ राऊळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT