district surgery post issues konkan sindhudurg 
कोकण

जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा घोळ 

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -  जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीचा घोळ अद्यापही कायम आहे. शासनाने प्रभारी म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. श्रीपाद पाटील यांना पदभार देण्यास जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी मॅटचा निकाल येईपर्यंत नकाराचा पवित्रा घेतला आहे. याचा जिल्ह्यातील अपंग रुग्णांचे दाखले आणि कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले तसेच अन्य कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीचा गुंता पालकमंत्री कसा सोडणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण यांची काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथे बदली झाली. त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे सोपवायचा शासन आदेश आहे; मात्र चव्हाण यांनी आपण मॅटमध्ये गेल्यामुळे पदभार देऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक पाटील यांची शल्यचिकित्सक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश शासनाने दिले, असले तरी अद्याप हा गुंता कायम आहे.

रूग्णालयातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना बरोबर शासकीय कर्मचाऱ्यांची मेडिकल दाखले, अपंगांचे दाखले यासह प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. सध्या डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या जागी कार्यरत झालेले चव्हाण यांची शासनाने बदली केली असली तरी त्यांनी हे पद सोडलेले नाही. या पदाबाबतचा घोळ कायम असून जिल्हा शल्य चिकित्सक केबिनमध्ये कोणी बसावे यावरून दोन अधिकाऱ्यांमधे वाद पेटला आहे. यातून शल्यचिकित्सकांच्या केबिनला कुलूप घालण्यात आले आहे. प्रभारी शल्यचिकित्सक पाटील यांनी अतिरिक्त शल्यचिकित्सक केबिनमध्ये बसून कामकाज सुरू ठेवले आहे. 

शासनाने यात निर्णायक भूमिका घेऊन हा गुंता सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाच्या कालावधीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक चाकूरकर यांच्या कामकाजावर बोट दाखवत जिल्हा रुग्णालयात समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तक्रार कक्ष तर शिवसेनेच्या माध्यमातून मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व समस्यावर आणि प्रश्‍नांवर मात करण्यासाठी शासनाने चाकूरकर यांची उप आयुक्तपदी बदली करून नवे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून चव्हाण यांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीनंतर रुग्णालयातील कामकाज सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना शासकीय आणि खाजगी डॉक्‍टरांच्या वादाचे पडसाद उमटले. अवघ्या दोन महिन्यातच चव्हाण यांची औरंगाबाद येथे शासनाने बदली केली; परंतु या आदेशानंतर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीवरून वाद निर्माण झाल्याने समस्या सुटण्यापेक्षा अधिकच समस्या वाढल्या आहेत. 
 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT