do not effect on lanja for farmers protest 
कोकण

लांजात देशव्यापी बंदला प्रतिसाद नाही

रवींद्र साळवी

लांजा - शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा लांजा शहर व तालुक्यात कोणताही परिणाम दिसून आला नाही. संपूर्ण बाजारपेठ सुरू होती तर मंगळवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने बाजारात खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. याखेरीज एसटी, रिक्षा व अन्य वाहतुकही सुरळीतपणे सुरू होती.

दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज भारतबंदची हाक देण्यात आली होती. संपूर्ण देशभर शेतकरी आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केलेला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील या आंगोलनाला पाठींबा दिला होता. त्यामुळे लांजा बंद राहणार का असा प्रश्न सर्वांना पडला होता. 

मात्र कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगातून कित्येक महिने प्रशासकीय आदेशाने व्यापाऱ्यांनी आपली दुकान सेवा बंद ठेवली असताना मंगळवार  आठवडा बाजार असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची कुचंबणा, गैरसोय होऊ नये म्हणून सद्यस्थितीत व्यापारी पेठ चालू ठेवण्याचा निर्णय लांजा तालुका व्यापारी संघटनेने घेतला होता.

 त्यामुळे आजच्या भारत बंदचा लांजात फज्जा उडाला. संपूर्ण लांजा बाजारपेठ सुरू होती. बाजाराचा दिवस असल्याने लोकांनी मोठी गर्दी केली होती. बंदचा कोणताही लवलेश या ठिकाणी दिसून आला नाही. एसटी, रिक्षा व अन्य वाहतुकही सुरळीतपणे सुरू होती.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेत

Kolhapur Sister Harassment : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणास एडक्याने मारहाण, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Ladki Bahin Yojna E-KYC साठी मोठी अपडेट, Aditi Tatkare यांची मोठी घोषणा | Sakal News

अमिताभ यांना उद्धटपणे बोलणाऱ्या इशितप्रमाणे 'या' मुलाने सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गमावलेले लाखो, एक करोडचा प्रश्न चुकला

Latest Marathi News Live Update: निलेश घायवळ प्रकरणी उच्च न्यायालयात शुक्रवारी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT