Do not provide electricity for Mega Diversion form farmer in sadvli kokan marathi news 
कोकण

कलींगडाचे झाले कौतुक पण महावितरण वीज देईना : शेती चालली वाळुन....

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : फेब्रुवारी महिन्यात संगमेश्वर धामणी येथील एका युवतीने पुढाकार घेवून श्रीमंत बळीराजा सेंद्रीय शेती गटामार्फत कलींगडाचे विक्रमी पिक घेतले.ही कलींगडे प्रथमच दुबईवारीला गेली याचे श्रेय जिल्ह्याने घेतले माञ याच शेतीगटाला महावितरणने अजुनही वीजपुरवठा न केल्याने ९ एकरातील पीक वाया गेले आहे.

कलींगड विक्री शुभारंभाला आमदार शेखर निकम उपस्थित होते.त्यांनी गटाचे विशेष कौतुक केले.माझ्याच कृषी महाविद्यालयातील ममता शिर्के या युवतीने नोकरीच्या मागे न लागता शेती गट स्थापन करुन युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिले असे गौरवोद्गार काढले व महावितरणने ताबडतोब कनेक्शन द्यावे अशी मागणी केली तरीही महावितरणने आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवूनया गटाचे नुकसान केले आहे.

धामणी श्रीमंत बळीराजा सेंद्रीय शेती गट​

अध्यक्ष चंद्रकांत बांबाडे यांनी सतत महावितरणकडे पाठपुरावा केला.आज हा कागद नाही उद्या तो कागद नाही अशी टोलवाटोलवी केली आहे.मार्च महिन्यात लाॅगडाउन सुरु झाला आणि कागदपञे काही पुरी करता आली नाहीत.केवळ कागदी घोडी नाचवण्यात हातचे पीक माञ जळुन गेले आहे.
वीज नाही म्हणुन राॅकेल,डीझेलचे पंप आणले माञ राॅकेल,डिझेलही मिळेनासे झाले.डोक्यावर हंडा घेवून ९ एकर शेतीला पाणी देणे शक्य आहे काय हे महावितरणने जाग्यावर येवुन पहावे असे बांबाडे यांनी सांगितले.

आमदारांचेही प्रयत्न ठरले फोल
भाजीपाला,गवार,भेंडी ,टोमॅटो ,वांगी ,मिरची सारे काही नुकसान झाले आहे.पाणी नाही,वीज नाही त्यात लाॅकडाऊनमुळे बाहेर जावून भाजी विक्री करता येत नाही म्हणुन या युवकांनी भाजीपाला मजुर,लमाणी कुटुंबाला दान करत त्यांचे आशीर्वाद घेतले.हे आशीर्वाद वीज कनेक्शन मिळवण्यासाठी अपयोगी येतील असे बांबाडे यांना वाटत आहे.आमदार शेखर निकम यांनी गांभिर्याने या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT