कोकण

चिपी विमानतळावर प्रवाशांच्या तपासण्या करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून मुंबई विमानतळावर उतरून चिपी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांची माहिती आरोग्य विभागास कळवावी. अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि त्या प्रवाशांची आरटीपीआर चाचणी दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखी सात दिवस होम क्वारंटाईन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

आदेशात म्हटले आहे, की ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही देशांमध्ये आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने हवाई वाहतुकीवर निर्बंध लावलेले आहेत. जिल्ह्यात ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांद्वारे जिल्ह्यातील हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी दिलेले आदेश किमान निर्बंध म्हणून काम करतील. आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावर उतरून विमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतील. त्यांच्यासाठी चिपी विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करावी. अशा प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास कळविवी. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती मिळालेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी वेगळ्या पथकाची नियुक्ती करावी. अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. प्रवाशांची आरटीपीआर चाचणी दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखी ७ दिवस होम क्वारंटाईन करावे.

ओमिक्रॉनचा प्रसार झालेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवासी विमानतळावर आल्यास आरटीपीआर चाचणी अनिवार्य राहील. हा अहवाल निगेटिव्ह आला तरी अशा प्रवाशांना १४ दिवस होमक्वारंटाईन करावे. आरटीपीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करा. याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सकांनी समन्वयाने करावी.

आरटीपीआर टेस्ट किंवा दोन डोस अनिवार्य

चिपी विमानतळावरून राज्याअंर्तगत विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडे लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या वेळेच्या ४८ तास अगोदरचे निगेटिव्ह आरटीपीआर चाचणी अहवाल अनिवार्य आहे. चिपी विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यांतील प्रवाशांच्या बाबतीत प्रवासाच्या वेळेच्या ४८ तास अगोदरचे निगेटिव्ह आरटीपीआर चाचणी अहवाल अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT