जंगलातला हत्ती
जंगलातला हत्ती  sakal
कोकण

दोडामार्ग : ‘कायरी’ देणार हत्ती आल्याची वर्दी

सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग: मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा, यासाठी अनेक देशांत आणि भारतातील अनेक राज्यांत वापरला जाणारा कायरी ॲनिडर (ॲनिमल इंस्ट्रशन डिटेक्शन अॅण्ड रिपेलंट सिस्टीम) डिव्हाइस आता दोडामार्गमध्ये वन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आला आहे. हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी व्हावा, त्या संघर्षातून माणूस आणि वन्यप्राणी यांचे जाणारे बळी व शेती बागायतीचे नुकसान कमी व्हावे, यासाठी तो डिव्हाइस बसविण्यात येतो. जिल्ह्यातील पहिलावहिला डिव्हाइस मोर्ले येथे बसविण्यात आला आहे. तो आता आपल्या रेंजमध्ये येणाऱ्या अगदी सशापासून हत्तीपर्यंतच्या सगळ्या वन्यप्राण्यांच्या आगमनाची वर्दी देईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध होता येणार आहे.

अनेक देशांत हत्ती आणि मानव संघर्षाप्रमाणेच इतर वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष सुरू आहे. आपल्या देशातही तीच परिस्थिती आहे. दोडामार्ग तालुक्यात २००२ मध्ये हत्ती आले. वीस वर्षांत हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. अनेकांचे बळी घेतले. अशा स्थितीत हत्ती-मानव संघर्ष कमी करणे, मानव आणि हत्ती यांच्या जीविताची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘कायरी ॲनिडर’ची निर्मिती म्हणजे आणखी एका दिलासादायक उपायाची निर्मिती म्हणावी लागेल.

‘कायरी’चे काम असे

‘कायरी ॲनिडर डिव्हाइस’च्या रेंजमध्ये होणारी हालचाल सेन्सर लगेच टिपेल. एकाच वेळी लाईट आणि सायरनचा आवाज येईल. त्या आवाजाने हत्ती किंवा अन्य वन्यप्राणी आल्याची सूचना मिळेल. शिवाय, त्या आवाजाने ते वन्यप्राणी आल्या पावली परत जाण्याची शक्यताही आहे. त्या प्राण्यांची छायाचित्रेही त्यातील कॅमेरा टिपणार आहे. मोबाईलवरूनही तो ऑपरेट करता येऊ शकतो. सौरऊर्जा, बॅटरीवर २४ तास चालतो.

गाझियाबाद मॉडेल तयार

गाझियाबाद येथे तयार झालेल्या डिव्हाइसचे मॉडेल कायरी ॲनिडर व्हीएफ १०० आहे. साधारणपणे १०० मीटरच्या क्षेत्रात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आगमनाची वर्दी तो डिव्हाइस देणार आहे. बांद्यातील एका फाउंडेशनतर्फे तो डिव्हाइस मोर्लेत बसविण्यात आला. या वेळी वनक्षेत्रपाल अनुप कन्नमवार, वनपाल शिरवलकर, सरपंच महादेव गवस, माजी सरपंच गोपाळ गवस, रमाकांत गवस, अविनाश गवस, प्रथमेश गवस, अजित गवस, अंकुश गवस, नीलेश गवस, यशवंत गवस आदी उपस्थित होते. याआधी वापर कुठे?

देशात- केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, झारखंड आणि तमिळनाडू.

परदेशात- भूतान, श्रीलंका, ब्राझील, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT