कोकण

शाळेला देणगी

CD

ताम्हाणे शाळेला
लाखाची देणगी

साडवली ः ताम्हाणे माध्यमिक विद्यामंदिरच्या इमारत दुरुस्ती कामामधील टाईल्स खरेदीसाठी दहावीच्या २००२च्या माजी विद्यार्थ्यांकडून एक लाख एक हजार एक रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये स्वप्नील मिरगल, समीर नटे, घनशाम शेलार, दिगंबर पाष्टे, राजू पेडणेकर, मंगेश आखाडे, दिनेश सुतार आणि गणेश माईन आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थाध्यक्ष अशोक सप्रे (काका), संस्था सचिव दिलीप गोवळकर, संचालक प्रभावळकर आणि राजू शिंदे यांनी केले. माजी विद्यार्थी आर्किटेक्ट प्रसाद रहाटेकडूनही शाळेला १० हजार ५०० रुपयांचा धनादेश प्रशालेस मदत म्हणून दिला.
----------

पाध्ये स्कूलमध्ये
रोबोटिक्स प्रयोगशाळा

साडवली ः रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अॅडव्हान्स्ड सेन्सर्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाची लहानपणापासूनच ओळख व्हावी व भविष्यातील तंत्रज्ञान विकासाच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची प्राथमिक तयारी व्हावी तसेच भावीकाळातील उच्च तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्दिष्टाने पाध्ये इंग्लिश स्कूलमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. यासाठी पुणे येथील स्काय रोबोटिक्स या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून पहिलीपासून दहावीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येईल. शैक्षणिक संस्थांनी देशाच्या प्रगतीकरिता आणि विकसित भारत बनवण्याची महत्वाकांक्षा डोळ्यापुढे ठेवून अत्याधुनिक सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना निर्माण करू दिल्या पाहिजेत.
----------
‘क्षत्रिय धारपवार’तर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप

पावस ः क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यास सुरवात झाली. यंदाही ग्रामीण भागातील सहा शाळांमध्ये हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरवात पोफळी, चिपळूण आणि रत्नागिरी शाळेतून झाली. क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे ज्येष्ठ सभासद व मार्गदर्शक सीतारामबाबा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष सचिन पवार, सहकार्याध्यक्ष सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT