Dr. Babasaheb Ambedkar Government Hostel in charge fraud in sindudurg kokan marathi news
Dr. Babasaheb Ambedkar Government Hostel in charge fraud in sindudurg kokan marathi news  
कोकण

वसतिगृहात हजेरीपत्रकावर मारल्या सह्या परंतु.....

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदूर्ग) : कणकवली-हरकुळ बुद्रूक गावच्या सीमेवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सडलेले धान्य पोषण आहारासाठी वापरले जाते, अशी माहिती पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी दिली.मागासवर्गीय मुलांच्या या वसतिगृहातील कारभाराची समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्‍त यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

या तक्रारीनंतरही वसतिगृहाचा कारभार न सुधारल्यास आम्ही वसतीगृह अधीक्षकांना वठणीवर आणू असा इशाराही सभापती श्री. तळेकर यांनी दिला. वसतिगृहातील मुलांच्या सुविधेसाठी दरवर्षी ४० लाख रुपयांचा निधी येतो; मात्र या निधीतही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सभापतींनी केला.वसतिगृहाची तळेकर यांनी आज पाहणी केली. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री तसेच पंचायत समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. वसतिगृह पाहणीनंतर सभापती श्री.तळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली.

हजेरीपत्रकावर सह्या मात्र उपस्थिती....
ते म्हणाले, वसतिगृहात एकूण ६ कर्मचारी आहेत. यातील एक अर्जित रजेवर गेलाय. तर ४ कर्मचारी हजेरीपत्रकावर सह्या करून गैरहजर असल्याचे आढळून आले. फक्‍त कार्यालय अधीक्षक संतोष जाधव हेच तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली. वसतिगृह ७५ मुलांचे आहे. तर हजेरीपटावर ३४ मुलांची नोंद आहे. तर प्रत्यक्षात १७ मुले उपस्थित आढळली. उर्वरीत १७ मुले कुठे गेली? 


अनेक गैरसोयी
श्री. तळेकर म्हणाले, पोषण आहारातील तांदूळ आणि गव्हाला कीड लागली आहे. मुलांना झोपण्यासाठीचे पलंग गंजलेले आहेत. चादर, बेडशिट मळलेल्या आहेत. वसतिगृह शहरापासून ६ किलोमिटर अंतरावर नेण्यात आलेय. पण मुलांना वाहतुकीची सुविधा नसल्याने त्यांना पायपीट करावी लागत आहे. वसतिगृहातील वरच्या मजल्यावरील शौचालय बंद आहे. तर तळमजल्यावरील शौचालयाची दुरवस्था आहे. प्रथमोचार सुविधा, अग्निशमन यंत्रणा कालबाह्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT