Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Minister Uday Samant esakal
कोकण

बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं कोणी धाडस केलं, तर राजकीय संन्यास घेऊ; उदय सामंतांचं मोठं विधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या मुळे मी राज्याच्या उद्योगमंत्री पदावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल अपप्रचार करत संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहेत.

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या मुळे मी राज्याच्या उद्योगमंत्री पदावर आहे. त्यामुळे संविधान (Constitution) बदलण्याचे कोणी धाडस जरी केले तर राजकीय संन्यास घेऊन तुमच्यासोबत असेन, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीत केले.

रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने आयोजित १३३ वा जयंती महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री सामंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी ते म्हणाले, काही लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल अपप्रचार करत संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहेत. मात्र संविधान बदलण्याचे कोणी धाडस जरी केले तर तुमचा उदय सामंत राजकीय संन्यास घेऊन तुमच्या सोबत राहील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे राज्याच्या उद्योगमंत्री आणि रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावर पोचलो आहे. मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे गेल्या वर्षीपासून शासकीय जयंती साजरी करण्यास सुरवात केली असून कायमस्वरूपी ही शासकीय जयंती सुरु राहणार आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी १८ एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडागणावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, बाबू म्हाप, राजन शेट्ये, एल. बी. पवार, संतोष कदम, कुमार शेट्ये, हारीस शेकासन, रफिक बिजापुरी, दीपक जाधव, बी. के. कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT