Dr Babasaheb Ambedkar Original House Stone Inspiring Lucknow 
कोकण

डॉ. बाबासाहेबांच्या मूळ घराचा दगड लखनौमध्ये प्रेरणास्रोत 

सचिन माळी

मंडणगड ( रत्नागिरी ) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्‍यातील आंबडवे या मूळ गावातील त्यांच्या घराच्या जागेवरील दगडाचा तुकडा लखनौ येथील बाबूला मोहनलाल बिद्यार्थी यांनी आपल्या घरात ठेवला आहे. हा दगड घरातील सदस्यांसाठी शिक्षण व संघर्षाचा प्रेरणास्रोत ठरत आहे. डॉ. आंबेडकरांच्या आदर्शावर संपूर्ण कुटुंब मार्गक्रमण करीत आहे. अशी कृतज्ञतेची भावना बिद्यार्थी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. सुमारे दोन हजार कि.मी.चा प्रवास करून 4 डिसेंबरला आंबडवे येथे स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी ते आले होते. या वेळी आंबडवेचे ज्येष्ठ ग्रामस्थ व अभ्यासक सुदामबाबा सकपाळ, गणपत सकपाळ उपस्थित होते. 

बाबूला बिद्यार्थी हे लखनौ येथे वास्तव्याला आहेत. दरवर्षी ते कुटुंब आणि मित्रपरिवारासमवेत डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळांना भेट देत असतात. त्यांनी आंबेडकरांच्या मूळ घराच्या ठिकाणी असणारा दगडाचा तुकडा आपल्या समवेत नेला. तो त्यांनी आपल्या घरात एका चांदीच्या प्लेटमध्ये ठेवला आहे. आपल्या घरात बाबासाहेबांचे घर असल्याची आमची भावना असून हा दगड बाबासाहेबांच्या आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देतो, असे बिद्यार्थी सांगतात. आंबेडकरांनी निर्माण केलेले आदर्श पाळून आयुष्यात मार्गक्रमण करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बिद्यार्थी हे स्वतः शिक्षित असून प्रशासनात सेवा बजावली आहे. तसेच आपल्या चारही मुलांना त्यांनी उच्चशिक्षण दिले. ती मुले मुख्याध्यापक, पोलिस इन्स्पेक्‍टर, बॅंक अधिकारी, शिक्षक आहेत. सुनाही उच्चशिक्षित आहेत.

त्रिस्थळीय तीर्थस्थानाना भेट

नावातच बिद्यार्थी म्हणजे विद्यार्थी हा शब्द असून आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, विचार यांचे वाचन करीत प्रत्येक गोष्ट अंगीकृत करून वाटचाल सुरू आहे. गेले पंधरा दिवसांपासून श्रद्धा आणि मुस्कान फाउंडेशनच्या वतीने त्यांचा प्रवास सुरू असून दापोली येथील माता रमाई यांच्या वणंद गावी भेट देऊन आंबडवे, महाड असा त्रिस्थळीय तीर्थस्थानाना भेट देऊन महापरिनिर्वाण दिनी पुणे, मुंबई येथील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. यात लखनौ व अलाहाबाद येथील राधेश्‍याम गौतम, आर. डी. गौतम, काली प्रसाद, मोहनलाल बाराबंकी, इंदादेवी, अजेश गौतम, रामपाल, सोहनलाल आदी सहभागी झाले आहेत. 


आर. डी. गौतम यांचे गीत गायन व पुस्तक भेट 

लखनौ येथे वकिली करणारे आर. डी. गौतम यांनी यावेळी स्वतः रचलेल्या बाबासाहेबांच्या संघर्षमय गौरवगीताचे सुमधूर आवाजात गायन केले. तसेच त्यांनी लिहिलेल्या गीत व गझल यांचे पुस्तके उपस्थितांना आठवण भेट म्हणून दिली. 

बाबासाहेब का मूळगाव आंबडवे आकर हर्षित हो गया हूँ. जिंदगीभर उनके उद्देशपर चलनेका प्रयास करता हूँ. आंबेडकर संघर्ष करके आगे बढे थे. उनके विचारपें चलनेवाला कभी पीछे मुडेगा नहीं, बल्की आगेही बढता हैं, ये मेरा विश्वास हैं. 
- बाबूला बिद्यार्थी, लखनौ  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : "इथे दादागिरी करायला हा रस्त्याचा नाका नाही" विशाल-ओमकारला रितेशचे खडेबोल

Latest Marathi News Live Update : भाजप वाढलं नाही बाहेरचे लोक मांडीवर घेतलेत - उद्धव ठाकरे

Sindhudurg ZP: निवडणूक रणधुमाळीत पैशांचा खेळ थांबवा; सावंतवाडीत प्रशासन सज्ज, स्थिर पथकांचा कडक पहारा

Tiger Safari: अवघ्या २५०० रुपयांत करा 'टायगर सफारी! चित्रकूटच्या जंगलातील एक रोमांचक प्रवास, वाचा Trip Plan!

Nashik Municipal Election शहाणे, जाधव, मुदलियार, पांडे ठरले ‘जायंट किलर’; दिग्गजांचा पराभव

SCROLL FOR NEXT