कोकण

आगामी निवडणुकीत मोदींना सत्तेपासून दूर ठेवा - डॉ. भालचंद्र मुणगेकर 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सत्तेतून जायला हवेत, अन्यथा देशातील लोकशाही धर्मनिरपेक्षता हद्दपार होईल व यापुढील निवडणूक होणार नाही, अशी भिती नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.

येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहांमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार हुसेन दलवाई, कॉंग्रेस प्रभारी तथा माजी आमदार सुभाष चव्हाण, माजी आमदार विजय सावंत, राजन भोसले, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू मसुरकर, निलीमा गावडे, साक्षी वंजारी आदी उपस्थित होते.

श्री. मुणगेकर म्हणाले, ""लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मोदींना मोदींची सत्ता येता कामा नये. अन्यथा 2019 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल. आपण नऊ राज्यांचा दौरा केला असून सर्वत्र मोदी विरोधात वातावरण असून जाती-धर्मात विषमता निर्माण करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.

काँग्रेसने निवडणुकीमध्ये नवरचना आखली आहे. काँग्रेस संपली जे म्हणतात त्याने येथे येऊन पहावे. एका माणसाच्या पाठीमागे एक हजार माणसे असलेली असलेले कार्यकर्ते या सभेमध्ये उपस्थित आहेत.

-  हुसेन दलवाई, खासदार

यावेळी विकास सावंत यांनी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षांमध्ये गेलेल्या किंवा काँग्रेस पक्षाचे असलेल्या कार्यकर्त्यांनी यापुढे घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. श्री. परूळेकर, राजन भोसले यांनी श्री. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर यांनी तर आभार विलास सावंत यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT