Dr. Dhananjay Chakurkar was finally replaced 
कोकण

डॉ. धनंजय चाकूरकरांची अखेर बदली 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची शासनाने नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने काल (ता.1) रात्री उशिरा आदेश काढले आहेत. 

राज्य शासनाने काल सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यात डॉ. चाकुरकरांचा समावेश आहे. यात डॉ. चाकुरकर यांची सहाय्यक संचालक वैद्यकीय सेवा (मुंबई) मंडळ ठाणे येथे रिक्त जागी बदली करण्यात आली. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांची सिंधुदुर्ग सामान्य रुग्णालय येथे शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. चव्हाण यांनी केलेल्या विनंतीनुसार ही नियुक्ती देण्यात आली. 

शल्य चिकित्सक म्हणून डॉ. चाकुरकरांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कोरोना काळात सुरुवातीला त्यांनी समन्वय राखून काम केले; परंतु नंतरच्या काळात त्यांची मनमानी सुरू झाल्याचा आरोप होता. कोरोनाची वस्तुस्थिती लपविणे. त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. वेळेत ठेकेदार नियुक्त न करणे. सहकारी अधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेणे असे आरोप झाले. त्यांच्या काळात मनसेने केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. त्यांच्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांतही तीव्र नाराजी होती. 

पदभार स्वीकारण्याचे आदेश 
शासनाने बदलीचे आदेश काढताना बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ पदभार स्वीकारावा. सुटी घेतल्यास किंवा दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. वरिष्ठांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास किंवा सुटी दिल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

SCROLL FOR NEXT