कोकण

बदलत्या कायद्याची जाण पत्रकारांना हवी : नीलम गोऱ्हे

सकाळवृत्तसेवा

गुहागर - पॉस्कोसारख्या घटनेत काही पत्रकार, छायाचित्रकार हे पीडित मुलीचे किंवा कुटुंबाचे फोटो घेतात. या कृत्यामुळे पोलिसही हैराण होतात. त्यामुळे बदलत्या कायद्याची जाण पत्रकारांना हवी, असे मत शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिसंवादात व्यक्त केले. 

चिपळूण येथील पत्रकारांच्या राज्यस्तरीय संमेलनात माध्यमांची विश्वासार्हता या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाचे अध्यक्ष विश्वास मेहेंदळे होते. परिसंवादात जतीन देसाई, समीरण वाळवेकर, नितीन केळकर, जयू भाटकर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले. प्रेक्षकात उपस्थित असलेल्या माधव भंडारींना आयत्यावेळी परिसंवादात सहभागी करून भाजपची सत्ता आल्यावर माध्यमांवरील सरकारचा दबाव वाढला आहे का, असा प्रश्न प्रसन्न जोशींनी विचारला. त्यावेळी आणीबाणीचा संदर्भ देऊन गळचेपी कोणी केली,असा उलट प्रश्न भंडारींनी केला.

नितीन केळकर यांनी इलेक्‍ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियापेक्षा आजची पिढी सोशल मीडियावर अधिक विश्वास ठेवते. योग्य, अयोग्य काय याची पडताळणीही ही पिढी करते, असे मत व्यक्त केले. ब्रेकिंग न्यूज दाखविताना वाहिन्यांनी ताळतंत्र सोडू नये,अन्यथा विश्वासार्हतेला तडा जातो असे मत समीरण यांनी मांडले. प्रबोधनात्मक कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून टीआरपी मिळत नसल्याची खंत प्रसन्न जोशींनी व्यक्त केली. माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. परिसंवादात विविध मुद्‌द्‌यांवर  चर्चा सुरू असताना वादाचा प्रसंगही उद्‌भवला. मात्र अध्यक्ष विश्वास मेहेंदळेंनी विनोदी शैलीतून हे वाद थांबविले.

युतीबाबत गोऱ्हेंचे मौन, भंडारी म्हणतात युती आहेच
नीलम गोऱ्हे आणि भंडारी एकत्र बसल्याने युतीचा विषयही समोर आला. गोऱ्हेंनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले, तर भंडारींनी युती आहेच असे सांगून टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT