Dr Shreenand Bapat Comment On Manuscript Ratnagiri Marathi News  
कोकण

हस्तलिखितांच्या इतिहासाबाबत डॉ. श्रीनंद बापट म्हणाले,

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - देशभरात दोन ते अडीच कोटी हस्तलिखितांमध्ये भारताचा इतिहास, विविध शास्त्रे, पौराणिक गोष्टी आदी सर्व प्रकारचे ज्ञान साठवून ठेवले आहे. बहुतांशी हस्तलिखिते संस्कृतशी निगडित आहेत. त्यांचे जतन करताना, अनुवाद, संपादन प्रकाशनही करता येईल. याकरिता अनुदानही मिळते. सीएसआर निधीतून आणि केंद्र सरकारच्या संस्थांकडून निधी मिळतो. गेल्या 100 वर्षांत भारतात विकसित झालेल्या या शास्त्रात काम करण्याच्या अनेक संधी आहेत, असे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे निबंधक व अभिरक्षक डॉ. श्रीनंद बापट यांनी आज येथे "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

हस्तलिखितशास्त्र कार्यशाळेसाठी श्री. बापट येथे आले आहेत. त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खूप संधी असल्याचे सांगताना ते म्हणाले, ""एखाद्या गावात जाऊन हस्तलिखित शोधण्याचे काम आव्हानात्मक असते. हस्तलिखिताच्या जतन, नोंदणी, अभ्यासासाठी अनेक संस्था पुढे आल्या. केंद्र सरकारने 18 वर्षांपासून नॅशनल मिशन ऑफ मॅन्युस्क्रिप्टची स्थापना केली. राजस्थानमध्ये सर्वाधिक हस्तलिखिते असून त्यापाठोपाठ कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पुण्यातील 12 संस्थांकडे दोन लाख हस्तलिखिते आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर घरगुती स्वरूपातील 55 संग्रह आहेत. एशियाटिक, फोर्ब्ज गुजराती सभा अशा अनेक संस्थांकडे हस्तलिखिते उपलब्ध आहेत. भांडारकर प्राच्यविद्यातर्फे तीन नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. वेगवेगळ्या जैन हस्तलिखितांमधील व्यक्तींची नोंदणी हा प्रकल्प लंडन युनिव्हर्सिटीच्या साह्याने सुरू आहे.'' 

हस्तलिखिते देण्याचे आवाहन 

कोकणात अनेक विद्वान घराणी, पाठशाळांमध्ये असे संग्रह असू शकतील. हा ज्ञानाचा साठा लपवून ठेवण्यात अर्थ नाही. असे संग्रह असणाऱ्यांनी हे संग्रह दाखवावेत. चांगल्या स्थितीत नसली तरी ते सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतील. असा संग्रह कोणीही घेऊन जात नाही किंवा सरकार जप्त करत नाही. त्याबाबत भिती बाळगू नये. या हस्तलिखिताची नोंदणी झाल्यास त्याचा उपयोग अभ्यासकांनाही करता येईल. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय, संस्कृत विभागाकडे हा संग्रह द्यावा. त्याचा अभ्यास केला जाईल, असे आवाहनही डॉ. बापट यांनी केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT