puc center
puc center sakal
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात पीयूसी सेंटर्सकडून वाहनचालकांची होतेय लूट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्ह्यातील पीयूसी सेंटर्सकडून सध्या वाहनचालकांची लूट सुरू झाली आहे. काही ठिकाणी एका प्रमाणपत्रामागे कारमागे दीडशे रुपये घेतले जातात.

चिपळूण - जिल्ह्यातील पीयूसी सेंटर्सकडून (PUC Centers) सध्या वाहनचालकांची (Vehicle Driver) लूट (Loot) सुरू झाली आहे. काही ठिकाणी एका प्रमाणपत्रामागे (Certificate) कारमागे दीडशे रुपये घेतले जातात. प्रत्यक्षात पावती मात्र ९० रुपयांची दिली जात आहे. पीयूसी सर्टिफिकेटसाठी शासनाने ठरवलेल्या फीपेक्षा (Fee) तब्बल चाळीस ते साठ रुपये जास्त घेतले जात आहेत; मात्र जास्तीचे आकारलेले पैसे कोणाकोणाच्या खिशात जातात आणि त्यासाठी वाहनचालकांना वेठीस का धरले जाते, असे सवाल येथील वाहनचालकांनी उपस्थित केला. या संदर्भात शहरातील पत्रकार मकरंद भागवत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्याकडेच थेट तक्रार केली आहे.

येथील पत्रकार मकरंद भागवत यांनी केलेल्या तक्रारीनुसार, जिल्ह्यातील वाहनांची खरेदी-विक्री तसेच प्रवासी वाहतूक, चालक परवाना काढणे आदींबाबत आरटीओ एजंट आणि संबंधित अधिकारी यांच्याकडून विविध मार्गाने लूट सुरू असल्याची ओरड सातत्याने होत असते; मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अधिकारी आणि एजंट यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांनी जातीने लक्ष घालून वाहनचालकांची विविध मार्गाने होणारी अडवणूक आणि लूट थांबवावी, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पीयूसी सेंटर्स आहेत. तक्रारदार भागवत यांना कारच्या पीयूसी सर्टीफिकेटसाठी दीडशे रुपये आकारले. त्यांनी आॉनलाइन रक्कम जमा केली; मात्र प्रत्यक्षात त्यांना ९० रुपयांचीच पैसे भरलेल्याची पावती देण्यात आली. यानंतर त्यांनी चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी लक्ष घालून वाहनचालकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणीही केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT