due to leopard one person accident in sindhudurg he injured strongly in sindhudurg 
कोकण

बिबट्या आडवा आल्याने झाला अपघात अन् झोपेतून जाग आल्यावर म्हणू लागले वाघ वाघ वाघ

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आरोस येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक (वय 45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेमध्ये (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. ही घटना काल रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. 

भरवस्तीत बिबट्या फिरत असून वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. 
दांडेली-आरोसमार्गे कोंडुरा रस्त्यावर गवे व बिबट्याचा वावर कायम असतो. गुरूवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वायरमन दीपक नाईक आपल्या घरी गिरोबावाडी येथून आरोस बाजार येथे जात होते. रात्रंदिवस ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी त्यांची सदोदित तळमळ असते.

आरोस मधलीवाडी येथे अचानक बिबट्याची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यात नाईक यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची बातमी ग्रामस्थांना समजताच त्यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी येथे हलविण्यात; परंतु नाईक यांना गंभीर अपघात झाल्याने अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे दाखल करण्यात आले. 

दीपक नाईक हे झोपेतून जाग आल्यानंतरही वाघ वाघ असे बोलत असल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. डॉक्‍टरांच्या प्रयत्नांना यश येत असून दीपक नाईक हे उपचारास प्रतिसाद देत आहेत. अपघातात त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


ग्रामस्थांत संताप 

झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार आणि भरवस्तीत फिरणाऱ्या अशा धोकादायक प्राण्यांपासून आमचे रक्षण कधी करणार असा सवाल दीपक नाईक यांच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांमधून केला जात आहे. आरोस गावात रानटी प्राण्यांपासून कोणत्याही ग्रामस्थांचे नुकसान किंवा इजा झाल्यास थेट कार्यालय गाठणार असल्याचे आक्रमक पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. 

"भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार गावात घडले आहेत. वनविभागाला वारंवार सांगूनही याकडे ठोस उपाययोजना होत नसल्याने अशा अपघातांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. निदान रात्रीच्यावेळी तरी वनविभागाने गस्त घालणे आवश्‍यक आहे."

- महेश आरोसकर, पोलिसपाटील (आरोस) 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT