due to not accept the order take by a CEO sarape post remove in ratnagiri 
कोकण

दुर्लक्षच नडला ; सरपंच, उपसरपंच मुकले पदाला

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्‍यातील वडवली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांना पदावरून हटविण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिले.

वडवलीत विशेष घटक योजना व पंचायत समिती सेस निधीतून शिवाजी पुतळा ते वडदहसोळ पक्की सडक जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण केले. कागदोपत्री १२ फूट रुंद असलेल्या या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार वैभव सीताराम जाधव यांच्यासह अन्य चार जणांनी केली होती. 


तक्रार करूनही अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायतीकडून कारवाई होत नसल्याने हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेले होते. या प्रकरणी ५ ऑक्‍टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अंतिम सुनावणी घेण्यात आली. अतिक्रमण हटविण्याबाबत राजापूर पंचायत समिती, तसेच सभापती यांनी आदेश देऊनही ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविले नाही. तसेच ऑक्‍टोबर २०१९ मध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झालेल्या सुनावणीतही अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी वडवली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून या सर्वांना सदस्यपदावरून हटविण्याचे आदेश दिले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT