Due to torrential rains in the Sahyadri valley the Jagbudi river flowing near Khed city has crossed the warning level 
कोकण

जगबुडीने ओलांडली इशारा पातळी : कोकणात पावसाचा जोर वाढला...

सिध्देश परशेटये

खेड (रत्नागिरी) : गेले चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणारी नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदीचा उगम सह्याद्रीच्या खोऱ्यातील बांद्रीपट्यात होतो. गेले चार दिवस या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या नदीची इशारा पातळी ६ मीटर तर धोका पातळी ७ मीटर आहे. आज दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरु असल्याने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५ मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्या चिंतेत भर पडली.

एका बाजूला जगबुडीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारिंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली की शहराला कधी पुराचा वेढा पडेल हे सांगता येत नाही. येथील व्यापाऱ्यांचा  हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे जगबुदी आणि नारिंगी  नदीच्या पाण्याची  पातळी वाढू लागताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सूरक्षितस्थळी हलविण्याची तयारी सुरु केली आहे.पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नसल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT