earned rs 40 lakhs from poultry farming in ratnagiri
earned rs 40 lakhs from poultry farming in ratnagiri 
कोकण

देश लाॅकडाऊन, पण यांनी या व्यवसायातून कमविले तब्बल एवढे पैसे 

संदेश सप्रे

देवरूख - कोरोनाच्या हाहाकारात अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मात्र संकटाला संधी मानून उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील सुमारे 500 बचत गटातील सुमारे 2600 महिलांनी लॉकडाऊनच्या काळात कोंबड्यांच्या विक्रीतून 40 लाखांची कमाई केली. अनेक ठिकाणी कोंबड्या फुकट वाटल्या गेल्या पण रत्नागिरीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) सुरवात संगमेश्वर तालुक्यामध्ये 2012-2013 ला झाली. दुर्गम व डोंगराळ भागातील महिला एकत्र आणल्या. सुमारे 2200 गटांची स्थापना करण्यात त्यांना यश आले. शाश्वत उपजीविकेसाठी भात लागवड, पारंपरिक व्यवसायांना चालना, झेंडू लागवडीपासून सुरवात झाली. परसातील कुक्कुटपालन सुरू केले. महिलांना प्रशिक्षणही दिले. 

चिकनचे दर घसरले, पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आल्याची ओरड झाली, याच काळात बचत गटाच्या चळवळीतील महिलांनी हजारो गावठी कोंबड्या विकल्या. लॉकडाऊनमुळे गावात अडकलेल्यांना मासळी मिळणेही मुश्किल झाले. त्यामुळे दोन पैसे जास्त मोजून ग्राहक कोंबड्या खरेदी करतात. त्याचा फायदा या महिलांना मिळाला. संगमेश्वर तालुक्यात 7 प्रभाग आहेत. 2019-20 या वर्षात सदस्यांनी गिरिराज, वनराज जातीची एक दिवसांची 16 हजार 939 पिल्ले, तर एक महिन्याची 16 हजार 227 पिल्ले खरेदी करण्यात आली. या वातावरणात चांगली तयार होतात. त्यांना मागणीही चांगली असते. मार्चअखेर 24 हजार 410 कोंबड्यांची सरासरी 350 रुपये या दराने विक्री करण्यात आली. यापासून सुमारे 61 लाख 2 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली. खर्च वजा जाता सुमारे 40 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. लॉकडाऊन काळात सुमारे 20 ते 25 लाख रुपयांची विक्री झाली. 


लॉकडाऊन काळात व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कोंबड्या मिळतील या  मेसेजला चांगला प्रतिसाद मिळून दोनशे कोंबड्याची विक्री झाली. हा फंडा आमच्या प्रभागातील महिलांना सांगितला. ओझरे प्रभागातील तेरा गटांनी विक्री केली. अजून पाच हजार पिल्लांची ऑर्डर आहे. 

-ज्योती माधव, ओझरे, बचत गट सदस्या, संगमेश्वर


महिला स्वयंप्रेरणेने पुढे येऊन स्वतः ऑर्डर देणे, माल आणणे व खाद्य खरेदी करून मालाची विक्री करतात. 549 स्वयंसहाय्यता गटातील सुमारे 2600 महिलांनी कुक्कुटपालन केले. शाश्वत उपजीविका म्हणून याकडे पहिले जात आहे. 

-हिंदुराव गिरी,  विस्तार अधिकारी व अभियान व्यवस्थापक, संगमेश्वर तालुका
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT