education minister uday samant help students 
कोकण

परीक्षेचे गुण चुकीचे आले अन्‌ मंत्री गेले मदतीला धावून   

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथील एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत धावून आले. रत्नागिरीतील प्रतीक कदम या विद्यार्थ्याच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मुंबई विद्यापीठाकडे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे गेल्याने त्याच्या निकालावर परिणाम झाला होता. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी उदय सामंत यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीमुळे संबंधित विद्यार्थ्याचा प्रश्‍न सुटला. 

येथील फिनोलेक्‍स कॉलेजमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या प्रतीक कदम या विद्यार्थ्याबाबत ही घटना घडली. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मुंबई विद्यापीठाकडे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे गेले. त्यामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्याचा निकाल देण्यात आल्याची घटना घडली. यामुळे विद्यार्थ्याचे एका शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार होते. विनाकारण त्यांच्या गुणपत्रिकेवर नापास, असा शिक्का बसणार होता. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 

हे पण वाचा - पदांच्या खांडोळ्या करण्याची रीत: कार्यकर्त्यांना जपण्यातच धन्यता  
 
43 गुणांऐवजी 4 गुण...! 
विद्यापीठाकडून संबंधित विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणपत्रकेमध्ये 43 गुणांऐवजी 4 गुण नोंदवले गेले. ही तांत्रिक बाब संबंधित महाविद्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ, नये म्हणून या प्रकरणी तत्काळ कार्यवाही होणे आवश्‍यक होते. ही बाब उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी तातडीने विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधला. योग्य त्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश दिले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT