

Pakistan Air Force Plane Crash
Esakal
Pakistan Air Force Plane Crash: पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. हवाई दलाचं प्रशिक्षण विमान नियमित उड्डाणावेळी अचानक रस्त्यात कोसळलं. यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. खैबर पख्तनख्वा प्रांतातील मरदान जिल्ह्यातल्या कटलंग रोडवर विमानाची दुर्घटना घडली. या घटनेनंतर अचानक विमानाने पेट घेतला. यात रस्त्यावरील काही दुचाकीस्वारही जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. PAF Aircraft Goes Down, CCTV Captures Fatal Crash