Vishal Parab sakal
कोकण

IT Park : सिंधुदुर्गात आयटी पार्कसाठी प्रयत्न - विशाल परब

येत्या काळात जिल्ह्यात आयटी पार्क तसेच पर्यटनावर आधारीत प्रकल्प उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी पुढे यावे.

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत. समाजसेवा आणि जनतेसाठी काम करणे, हाच या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आमदार, खासदार याबाबत होणारी चर्चा ही चर्चाच आहे.

येत्या काळात जिल्ह्यात आयटी पार्क तसेच पर्यटनावर आधारीत प्रकल्प उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन भाजप युवा नेते उद्योजक विशाल परब यांनी केले. मी कोणाचा राजकीय स्पर्धक नाही किंवा मला कोणाशी स्पर्धाही करायची नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे राजकीय भवितव्य हा येणारा काळ ठरवेल, असेही श्री. परब म्हणाले.

श्री. परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्यांनी-ज्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला, त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करण्यामागे माझा राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. शहरात लागलेले बॅनर व त्यांनी केलेली भाषणे यातून भविष्यात आमदार किंवा खासदारकीसाठी माझा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

परंतु, असा कुठलाही हेतू किंवा स्वार्थ या मागे नसून केवळ जनसेवा आणि समाजसेवक म्हणून मी पाहत आहे. मी या आधीही जिल्ह्यात येथील जनतेला सहजरित्या पाहता येणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. भविष्यातही यापेक्षाही कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. परंतु, त्यामध्ये माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नसणार.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत. त्यामुळे मी राजकीय स्पर्धेत आहे, असा गैरसमज कुणी करू नये. माझे राजकीय भवितव्य काय असेल? हा येणारा काळच ठरवेल. भविष्यात राजकीय पद मिळाल्यास ते स्वीकारायचे की नाही याचा निश्चितच विचार करेन. कारण पद स्वीकारल्यास त्याला तितका वेळ देणे आवश्यक आहे.

तुर्तास तरी मी उद्योजक असून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून या जिल्ह्यात आयटी पार्कसारखे उद्योग आणून या जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न आहे. मी देश-विदेशात फिरत असतो. तेथील विविधता पाहता आपल्या कोकणातही ती विविधता पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. ज्याप्रमाणे गोवा पर्यटनाच्या माध्यमातून स्पर्धा करत आहे, ती येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग ही करेल."

काही कारणास्तव राणे कुटुंबीय अनुपस्थित

सावंतवाडीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राणे कुटुंबातील सदस्य काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, त्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज करू नये. मला राणे कुटुंबियाकडून फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनानुसारच माझी वाटचाल असेल, असे यावेळी श्री. परब यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT