eknath shinde
eknath shinde sakal media
कोकण

रत्नागिरीच्या विकासासाठी साडे आठ कोटी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीतील रस्ते विकास आणि जे जे आर्ट ऑफ स्कुलकडुन होणाऱ्या शहराच्या सुशोभिकरणासाठी उच्च वतंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या मागणीनुसार तत्काळ साडे आठ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जनतेचा हा पैसा असून त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. विकास कामांना दर्जा पाहिजे. त्यासाठीजिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष देऊन ती दर्जेदार कामे करून घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.अवघ्या दोन तासात नगरविकास खात्याने साडे आठ कोटीचा अध्यादेश काढला.रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मी आराखडा पाहिला. अतिशयसुंदर इमारत होणार आहे. शहराचा कारभार हाकताना काही निर्णय किंवा ठराव घ्यावे लागतात. प्रशासकीय इमारत ही विकासाचे केंद्र असते.त्यामुळे चांगले काम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून साडे सोळा कोटी रुपये मंजूर केले आहेत.

जुन्या इमारतील ५० वर्षेझाली आहेत. ती जीर्ण आणि वापरास धोकादायक असल्याने मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माझ्याकडे मागणी केली होती. त्यानुसारवैशिष्टपुर्ण निधीतून नवीन प्रशासकीय इमारतीला मंजूर करून आज त्याचे काम सुरू झाले. लोकांना हवा असलेला कारभार, विकास यावास्तूतून व्हावा.एक देखणी, चांगली, उत्तम दर्जाची इमारत येथे उभी करा आणि येथील नागरिकांसाठी चांगले काम करा. येथे विकासात्मककाम करीत असताना पर्यावरणाचा समतोल राखून विकास कामे करा. जिल्हयातील नगरपंचायत, पालिका विकासकामांसाठी प्रस्ताव सादरकरावेत, त्यांना निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मात्र यातून दर्जेदार काम करा. दर्जा चांगला राहण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्या, अशासूचनाही त्यांनी केल्या.

मंत्री उदय सामंत यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी, लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक वास्तूसाठी आणि शहरातील रस्त्यांसाठीनिधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगरविकास मंत्र्याचे आभार व्यक्त केले. उर्वरित रस्त्यांसाठी आणि रत्नागिरी शहर सुशोभिकरणासाठी सुमारेसाडे आठ कोटी निधीची गरज असून याची त्यांनी घोषणा करावी, अशी मागणी केली. तेव्हा शिंदे यांनी आपल्या भाषणात रत्नागिरी शहरासाठीसाडे आठ कोटी रुपयाची घोषणा लगेच केली. काही तासात तसा आदेश काढला जाईल,असा शब्द दिला अन अवघ्या दोन ते अडीच तासातसाडे आठ कोटी रुपये मंजूर झाल्याचा अध्यादेश मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियावर टाकला.

राजापूरलाही ३ कोटी रुपये

आमदार राजन साळवी यांनीही राजापूर शहरासाठीच्या जलशुद्धकरण केंद्रासाठी आणि रस्ते विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.यावेळी शिंदे म्हणाले, रत्नागिरीप्रमाणे राजापूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि रस्त्यांना तत्काळ ३ कोटीचा निधी मंजूर केला जाईल,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

राजकारणात तुम्हाला 'संतान' होत नाही तर माझा काय दोष; उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना असं का म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Jadeja CSK vs RR : रविंद्र जडेजाचं 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड', मुद्दाम केलं की ठरला अनलकी? पाहा VIDEO

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीची अवस्था खराब; आरसीबीने 4 षटकात केले 4 फलंदाज बाद

SCROLL FOR NEXT