eight student suicide in ratnagiri 
कोकण

वडील म्हणाले मोबाईलवर गेम खेळू नकोस अन् मुलीनं संपविले जीवनच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरीः मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडल्याच्या रागातून सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील १५ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर मोहल्ल्यात खळबळ उडाली. आत्महत्येची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील मारिया आजिम दाऊद ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेते. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकण्यासाठी ती घरातील मोबाईल वापरत होती. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल वापरायचा अशी सक्त ताकीद तिच्या वडिलांनी दिली होती. तरीही मंगळवारी मारिया मोबाईलवर गेम खेळताना वडिलांना दिसली. यापुढे मोबाईलवर गेम खेळू नको, असे सांगत त्यांनी तिला दम भरला होता. 

वडील ओरडल्याच्या रागातून मारियाने रात्रीच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घरातील नातेवाईक उठल्यानंतर मारियाचा शोध घेण्यात आला. यावेळी एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत ती आढळून आली.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT