Deepak Kesarkar and Narayan Rane
Deepak Kesarkar and Narayan Rane sakal
कोकण

बंड अंगलट येणार?

एकनाथ पवार

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३७ हून अधिक आमदारांसह बंड केले.

पहिल्यांदा राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेविरोधात बंड पुकारलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेले बंड त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय चित्र पाहता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यांना बंडातून तारण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३७ हून अधिक आमदारांसह बंड केले. आता तर या गटांकडून प्रतिशिवसेना स्थापन करण्याची चर्चा सुरु झाली आहे. या गटाने महत्त्वाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांचे बंड शमण्याची आणि ते परत येण्याची शक्यता धूसर झाली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी आता थेट शिवसेना नेत्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

आमदार केसरकर यांची राजकीय कारकीर्द सावंतवाडी पालिकेतून सुरू झाली. सावंतवाडी शहराच्या विकासाचे रोल मॉडेल त्यांनी सावंतवाडी तालुक्यांसह सर्व मतदारसंघात ठेवीत २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक जिंकली. त्यावेळी प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केली; मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या नारायण राणेंनी केसरकरांना निवडून आणण्याची भूमिका घेतली आणि बहुमताने त्यांना निवडून आणले. त्यानंतर २०१४ मध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावर बंडाचे निशाण फडकावीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. दुसऱ्यांदाही ते निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्यावर गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी निवडणूक लढविली. यावेळी शिवसेना आणि भाजप युती होती; परंतु भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजन तेलींनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. यापूर्वी मंत्रिपद सांभाळल्यामुळे त्यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेवर प्रभाव असलेले खासदार विनायक राऊत यांनीच केसरकरांचे मंत्रिपद कापले, असा समज केसरकरांनी करून घेतला. तशा प्रकारची चर्चा देखील सुरू होती. त्यामुळे केसरकर शिवसेनेत नाराज होते.

मंत्रिपद न मिळाल्याचे शल्य, खासदार राऊतांबरोबर असलेले मतभेद यामुळेच केसरकर यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाणे पसंत केले. केसरकर यांनी प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली नसली, तरी त्यांच्यावर जोरदार टीका मात्र झाली. भविष्यातील विधानसभा निवडणुकीत केसरकरांना स्वबळावर निवडणूक लढविणे सोपे जाईल, अशी सध्या स्थिती नाही. या मतदारसंघात नारायण राणेंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपकडून राजन तेली, संजू परब हे इच्छुक आहेतच; परंतु राणेंनी अलीकडेच लखम राजे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. केसरकर आणि फडणवीस यांच्यातील ऋणानुबंध पाहता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकेल; मात्र राणेंचा कल हाच महत्त्वाचा राहील. सध्या निवडणूक झाली तर शिवसेनेकडे ठोस चेहरा दिसून येत नाही. यापूर्वी शैलेश परब या कार्यकर्त्याने मतदारसंघाची बांधणी केली होती; परंतु आता शिवसेनेला येथे उमेदवार आयात करावा लागेल, अशी स्थिती आहे.

सद्यःस्थिती

  • केसरकरांच्या भूमिकेमुळे राजकीय अस्थिरता

  • राणे कोणाला मदत करतात यावर निकाल अवलंबून

  • सावंतवाडीत शिवसेनेकडे चेहरा नाही

  • स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT