कोकण

निवडणुकीच्या वाऱ्यांनी सेनेतील नाराजी उघड

क्षेत्रप्रमुखपदाची जबाबदारी बाळा कदमांवर, पालिकेची निवडणूकीच्या तोंडावर निर्णय

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील (chiplin tehsil) शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. (shivsena) त्याचा परिणाम आगामी पालिका निवडणुकीवर होऊ नये, यासाठी अंतर्गत बदलाचे वारे सुरू झाले आहेत. शहराची जबाबदारी क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी येथील विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे आणि तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहे. राकेश शिंदे यांना डावलून प्रताप शिंदे यांना पंचायत समितीचे उपसभापतिपद देण्यात आले. त्यामुळे राकेश शिंदे नाराज आहेत. तालुकाप्रमुख असलेल्या व्यक्तीकडे उपसभापतिपदाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला. शहरप्रमुख उमेश सपकाळ यांच्याकडे पालिकेचे गटनेतेपद आहे. शिवसेनेत एकाच व्यक्तीकडे दोन पदे असल्याचीही दोन उदाहरणे आहेत.

चिपळूण पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व हळूहळू संपत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत असताना शिवसेनेचे काही कार्यकर्तेही नेतृत्वाअभावी राष्ट्रवादीच्या पंगतीत बसत आहे. तालुक्यात शिवसेनेचे वेगळे अस्तित्व जाणवेल, असे कोणतेही उपक्रम राबवले जात नाहीत. तरीही प्रताप शिंदे यांच्याबद्दल अजून तरी उघडपणे कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही.

सकपाळ यांच्याबद्दल तक्रारी

उमेश सकपाळ यांच्याबद्दल पालिकेतील महिला नगरसेवकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रारी केल्या आणि राजीनामा देण्याचा इशारा दिला. पालिकेत विश्वासात घेतले जात नाही, मुख्याधिकाऱ्यांना भेटू दिले जात नाही. पार्टी बैठकीत जे निर्णय होतात, ते नंतर बदलले जातात. शहरप्रमुख आमचे फोन घेत नाहीत, असा आरोप महिला नगरसेवकांनी खासदारांनी घेतलेल्या बैठकीत केला. त्याची दखल खासदार राऊत यांनी घेतली आणि शहराची जबाबदारी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांच्याकडे सोपवली.

कदम हे राऊत यांचे विश्वासू

पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. नगरसेवकांमधील नाराजीचा फटका पक्षाला बसू नये, तसेच महिला नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बाळा कदम हे राऊत यांचे विश्वासू मानले जातात. यापूर्वी त्यांनी दीर्घकाळ शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच पालिकेत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदावरही काम केले आहे.

एक नजर..

  • पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी स्थापन

  • आघाडीमुळे तालुक्यातील सेनेचे अस्तित्व संपतेय..

  • काही कार्यकर्तेही नेतृत्वाअभावी राष्ट्रवादीच्या पंगतीत

  • वेगळे अस्तित्व जाणवणारे कोणतेही उपक्रम नाहीत

  • प्रताप शिंदेंबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT