election of grampanchayat unopposed in kherdi chiplun ratnagiri 
कोकण

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न ; नेत्यांच्या बैठकांना वेग

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खेर्डीतील दोन गटाची माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी काल बैठक झाली. कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी कार्यकर्त्यांशी दोन दिवसांत चर्चा करून निर्णय सांगू, असे सांगितले आहे.

अनेक उमेदवारांनी वर्षभरापासून निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी करीत खर्च केला आहे. त्यामुळे बिनविरोधची शक्‍यता कमी असल्याची चर्चा खेर्डीत सुरू आहे. खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे एकप्रकारे रणसंग्रामच असतो. या ठिकाणी दोन गट आमने- सामने येतात. यामुळे येथील निवडणूक चुरशीची होते. अनेक वर्षे एकत्र असलेले आता आमने- सामने आल्याचे चित्र आहे.

अशातच बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रवादीतील दोन गटाची बैठक माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी आमदार निकम यांच्यासह माजी आमदार रमेश कदम, दादा साळवी, शौकत मुकादम, सुचय रेडीज, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, खेर्डीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दशरथ दाभोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खेर्डीतील जयंद्रथ खताते गटाकडून सुकाई परिवर्तन पॅनल तर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दाभोळकर यांच्याकडून गाव पॅनलची तयारी केली जात आहे. त्यासाठी काही उमेदवारही निश्‍चित झाले आहेत. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने त्याआधी कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 

दुमत नाही...मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार

बैठकीत नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जेथे शक्‍य, तिथे बिनविरोध निवडणूक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. यानुसार खेर्डी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते यांनी खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यास आपले दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

कार्यकर्ते मान्यता देतील ?

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या अगोदर वरिष्ठांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. आता उशीर झाला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासंदर्भात कार्यकर्ते मान्यता देतील, अशी शक्‍यता वाटत नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT