the electricity bill increased and problems faced by businessman in sindhudurg sanjay bhogate against this incident 
कोकण

नाहीतर संपूर्ण तालुका बंद ठेवू : संजय भोगटे

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये कोरोना लॉक-डाऊन कालावधीतील वाढीव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तालुक्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात यावी असे ठरले. गावनिहाय दौरा केला असता तेथील व्यापाऱ्यांनी  वाढीव व अवास्तव वीजबिल बाबत पाढा वाचला. यापुढे व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिलासा मिळाला नाही तर संपूर्ण तालुका बंद ठेवून मोर्चा काढावा लागेल असा इशारा तालुका अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिला.

यावेळी भोगटे म्हणाले नेरूर, वालावल, पाट, पिंगुळी, माणगाव तीठा, माणगाव बाजार, पणदूर, कडावल, ओरोस, कसाल  या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता वीज वितरणकडून वीजबिल भरण्याबाबत सक्ती केल्याचे सांगितले. काही ठिकाणी बंद असलेल्या घरांचे वीजबिल 12 हजार रुपये काढल्याचे समजले, तर काही ठिकाणी बंद असलेल्या कोल्ड्रिंक व्यापाराचे सुद्धा अवाच्या-सवा बिल काढून भरायला सांगितले. वीज मिटर फॉल्टी असल्यामुळे वीजबिले जास्त आल्याचे काहीनी सांगितले. 

एका व्यापाऱ्याची लॉकडॉउन पूर्वीच महावितरणने वीज कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित केलेला आहे, तरीही अशा ग्राहकांची अवास्तव बिल देखील लॉकडाऊन दरम्यान काढण्यात आली. या आणि अशा अनेक तक्रारी व्यापाऱ्यांनी आमच्या समोर मांडल्या. त्यामूळे तालुका दौरा केल्यानंतर शासनाला तहसीलदार कुडाळ यांचेकडे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तरीही त्याबाबत व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिलासा मिळाला नाही, तर संपूर्ण तालुका बंद ठेवून मोर्चा काढावा लागेल असेही ठरविण्यात आले. यावेळी व्यापारी प्रकाश कुंटे, बाबल गावडे, गोविंद सावंत, दीपक गावडे, सतीश माडये, हरेष घुर्ये आदी उपस्थित होते

.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT