आदित्य ठाकरे sakal
कोकण

29 मार्चला मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीत, रिफायनरीचा मुद्दा तापणार?

नगरपालिकेंतर्गत २ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे २८ मार्चपासून कोकण दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्गमधून त्यांचा दौरा सुरू होणार असून रत्नागिरीत २९ ला गणपतीपुळे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. श्री. ठाकरे २८ ला सकाळी मुंबईहून सिंधुदुर्गकडे रवाना होतील. मालवण येथे बंदर जेट्टी पाहणी व फिश अ‍ॅक्वेरिअम जागेसंदर्भात चर्चा, १२ वाजता देवगड येथे नगरपालिकेंतर्गत २ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. २९ ला सकाळी १०.३० वाजता राजापूरमधील धूतपापेश्‍वर मंदिराची पाहणी, दुपारी १२.४५ वाजता लांजा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा, दुपारी ३.१५ वाजता गणपतीपुळेतील बोट क्लबची पाहणी, ४.१५ वाजता जयगड येथून फेरीबोटीने गुहागरला जाणार असून ६ वाजता कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहतील.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाणार रिफायनरी प्रकल्प नागपूरला नेणार असल्याचे बोलले जाते. यावर सामंतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने शिवसेनेने स्थानिकांच्या सोबत राहुन प्रकल्प रद्द केला आहे. आता स्थानिकांचा विरोध मावळून रिफायनरी प्रकल्पाला त्यांचे समर्थन असेल तर शिवसेनेचा त्याला विरोध असण्याचा संबंध नाही. स्थानिकांची भुमिका समजून घेतली पाहिजे. त्यांना योग्य पॅकेज दिले पाहिजे. स्थानिकांच्या भुमिकेवर आमची भुमिका असून स्थानिकांना प्रकल्प मान्य असले तर तो आम्हालाही मान्य असेल अशी भुमिका सामंत यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

SCROLL FOR NEXT