कणकवली : मंत्रिपद न मिळाल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केली. सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांवरही त्यांचा प्रचंड राग आहे. त्यामुळेच ते वैभव नाईक यांना मंत्री करा असे सांगत असल्याचेही उपरकर म्हणाले. उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - दिवाळीचा बाजार अवघ्या 59 रुपयांत -
ते म्हणाले, आजारपणामुळे मतदार संघात आलो नसल्याचे दीपक केसरकर वारंवार सांगत आहेत. मात्र कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून ते मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी टीकाटिप्पणी सुरू केली आहे.
ते म्हणाले, चांदा ते बांदा योजना बंद करत सिंधू-रत्ना योजना मुख्यमंत्र्यांनी आणली. तेव्हा मुख्यमंत्र्यांवर केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपण किती प्रेम करतो आणि त्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे, याबाबतचा दिखाऊपणा ते करत आहेत.
वस्तुत: केसरकरांना बाजूला करण्यात खासदार विनायक राऊत यांचा हात असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. केसरकर यांनी त्याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे आणि शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे सच्चा शिवसैनिक कार्यकर्ता विस्कळीत झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर प्रचंड राग दीपक केसरकर हे राष्ट्रवादीत असल्यापासून त्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी सख्य नव्हते. सामंत पालकमंत्री झाल्यानंतर केसरकारांचा राग आणखी उफाळून आला. त्यामुळेच जिल्ह्यात मंत्रीपद असायला हव आहे.
वैभव नाईक यांना मंत्री केलं असत तर त्याला माझा विरोध नव्हता, असे आता केसरकर सांगत आहेत. पण त्यावेळी कुठेही बोलताना दिसले नाही. उपरकर म्हणाले, केसरकर पालक मंत्री असताना त्यांनी जिल्हा विकासाबाबत वारेमाप आश्वासने दिली होती. अनेक कामांची भूमिपूजन देखील झाले. प्रत्यक्षात मात्र एकही काम उभे राहिले नाही. त्यामुळेच चष्मा कारखाना,आयटी पार्क, ८०० लोकांना नोकऱ्या व अन्य आश्वासनाचे काय झाले ? केलेल्या घोषणा केव्हा पूर्ण करणार? असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.