ex MLA pramod jathar corona positive in kankavli sindhudurg 
कोकण

माजी आमदार प्रमोद जठार यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जठार यांनी केले आहे.

जठार यांना दोन दिवसापूर्वी तापाची लक्षणे असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली होती. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. तसेच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असली तरी आपली तब्बेत ठणठणीत असल्याचे जठार यांनी म्हटले आहे.

दरम्यान उद्यापासुन महापालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत नाईट कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT