Ex-serviceman Ramchandra Sawant Pakistan failure 1971 war Electric current in water to kill Indian army sakal
कोकण

पाकच्‍या शक्कल निकामी; युद्धात बाजी

माजी सैनिक रामचंद्र सावंत; भारतीय सैन्याला मारण्यासाठी पाण्यात वीजप्रवाह

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पाकिस्तानला १९७१ च्या युद्धामध्ये धुळ चारलेले ते दिवस आठवले की आजही अंगावर शहारे येतात. भारत मातेसाठी जिवाची बाजी लावून आम्ही पाकिस्तानच्या छाताडावर बसण्याचा निर्धार केला होता. कराचीपासून काही अंतरापर्यंत असलेल्या शक्करगडमध्ये होतो. दिवसभर रेकी करून रात्री तोफांचा मारा करायचो. या दरम्यान प्रतिकार होण्याच्या वेळेत म्हणजे काही मिनिटाच्या अवधीतून आम्ही पाकिस्तानी सैनिकांच्या दिशेने कूच करीत होतो. आम्हाला रोखण्यासाठी पाण्यात वीज सोडली होती, अशा आठवणी माजी सैनिक रामचंद्र देमाजी सावंत यानी जागविल्या.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव शिगेला पोचला असताना कोळीसरे (ता. रत्नागिरी) येथील सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, पाक सैन्याच्या अघोरी प्रकारांवर मात करत आपल्या सैन्यांने युद्ध जिंकले. हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला होता. रामचंद्र सावंत म्हणाले, ‘‘मी तेव्हा आर्मीतील महार रेजिमेंटमध्ये होतो. भारत-पाकमध्ये युद्ध सुरू होते. सुरुवातीला पाकिस्तानने हवाई दलाच्या माध्यमातून भारताच्या ११ स्टेशनवर हल्ले केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात झाली. ३ डिसेंबर १९७१ मोठी ठिणगी पडली. युद्ध १३ दिवस सुरू होते. पाकिस्तानातील कराची काही कि.मी. अंतरावर असताना आम्ही भारतीय सैनिक मोठ्या त्वेशात पाकिस्तानी सैन्यांवर मात करीत पुढे-पुढे सरकत होते. दिवसभर परिसराची रेकी वरिष्ठ पातळीवर होत होती. त्याच्याकडून येणाऱ्या आदेशावरून आम्ही जीवाची पर्वा न करता निधड्या छातीने तोफा, बंदुकांच्या गोळ्यांचा सामना करीत होतो.

९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना बंदी

पाकिस्तानी धुर्तपणे आम्हाला रोखण्यासाठी अनेक शक्कला लढवत होते. त्यांनी अखेर पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला. आम्ही त्यावर मात करीत लाकडी बोटी घेऊन आगेकूच केली. युद्धामध्ये अखेर भारत-पाक सैनिकांचा पूर्व आणि पश्चिम दोन्ही फ्रंटवर सामना झाला. जोपर्यंत पाकिस्तान समर्पण करेपर्यंत हे घमासान सुरू होते. अखेर १६ डिसेंबर १९७१ ला हे युद्ध समाप्त झाले. तेव्हा ९० ते ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनविण्यात आले. आम्ही देश सेवेच्या कामी आलो, हेच आमचे भाग्य.

समाज सेवेबरोबर देहदानही...

देशासाठी कधीही बलिदान देण्यास आम्ही तयार आहोत. निवृत्तीनंतर मी समाज सेवा करतो. अनेकांना शक्य तशी मदत करीत आलो आहे आणि करत राहणार आहे. भारत मातेने आम्हाला जे दिले, त्याने आम्ही धन्य झालो आहे. माझे जीवन सार्थ झाले. आता मी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सावंत सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT