Excavation of Mud From Kajali River water Day special story 
कोकण

जागतिक जलदिन विशेष ः एकच ध्यास, गाळ उपसा करून काजळी नदीची स्वच्छता 

अमित पंडित

साखरपा ( रत्नागिरी) - पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी नदी, पण उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, कोरड्या पडलेल्या विहिरी, हे चित्र कोंडगाव, साखरपा परिसरातले. गाळाने भरून गेलेली काजळी नदी साफ करणे हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय आहे, हे जाणून ग्रामस्थांच्या आणि स्थानिक संस्थांच्या पुढाकारातून नदी स्वच्छतेची मोहिम गेले महिनाभर सुरू असून त्यामुळे गाळ उपशानंतर नदी आता मोकळा श्‍वास घेत आहे. 

कोंडगाव आणि साखरपा गावांना लागून काजळी नदी वाहते. पावसाळ्यात रौद्र रूप धारण करणारी ही नदीचे पाणी बाजारपेठेत शिरते. अनेक वर्षापूर्वी उन्हाळ्यातही या नदीत पोहण्याचा आनंद घेता येत असे. मात्र आता नदीच्या काठालगत असलेल्या गावातही प्रचंड पाणीटंचाई जाणावते. वर्षानुवर्षे नदीतून वाहत आलेल्या गाळामुळे नदीपात्र भरून गेले आणि परिणामी पाणी जिरण्याऐवजी वाहून जाऊ लागले. त्यातून पाणी टंचाई निर्माण होऊ लागली. 

यावर उपाय म्हणजे नदीतील गाळ उपसणे हे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर स्थानिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. श्री दत्त देवस्थान कोंडगाव, दत्तसेवा पतसंस्था, व्यापारी मंडळाच्या पुढाकारातून गाळ उपसा गेले महिनाभर सुरू आहे. या उपक्रमाला नाम फाउंडेशनचा मोठा हातभार लागला आहे. नाम फाउंडेशनने गाळ उपसण्यासाठी पोकलेन मशीन कोणतेही भाडे न आकारता दिले आहे. या मशिनद्वारे काजळीतील गाळ काढला जात असल्याने नदीपात्र रुंदावताना दिसत असून पात्राची खोलीही वाढली आहे. 

पाणी निर्माण करू शकत नसलो तरी पाणी अडवणे शक्‍य आहे. यासाठीच नदीतील गाळ उपसणे गरजेचे होते. यामुळे नदी पुन्हा पूर्वीसारखी मोकळी होऊन वाहू लागेल. पाणी पातळी वाढली की आपोआपच परिसरातील पाणी टंचाई कमी होईल. 
- श्रीधर कबनूरकर, चेअरमन, दत्तसेवा पतसंस्था 


एक नजर 
- काजळी नदीला लागून असलेल्या विहीरींमधून पाणीटंचाई 
- नदीतील गाळ उपसणे हा एकमेव उपाय 
- दत्त देवस्थान आणि दत्तसेवा पतसंस्थेचा प्रमुख पुढाकार 
- व्यापारी मंडळ आणि नाम फाउंडेशनचा मोठा हातभार 
- महिन्याभरापासून गाळ उपसून नदी पात्र स्वच्छतेकडे वाटचाल. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : वरळी डोम परिसरात प्रचंड गर्दी, साडे अकरा वाजता मेळाव्याला सुरुवात

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

Zodiac Prediction: आज शुभ वेशीचा दुर्मिळ योग, मिथुन, कर्क अन् तूळ राशींसाठी असेल शुभ

SCROLL FOR NEXT