Experiments that keep art alive through digital technology ratnagiri
Experiments that keep art alive through digital technology ratnagiri sakal
कोकण

डिजिटल तंत्राद्वारे कला जिवंत राखणारे प्रयोग

नरेश पांचाळ

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात अनेक कोकणी कलाकारांनी आपल्या कला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यातून कलाकार आणि कला तेवत राहिलीच पण काहींना त्यातून आर्थिक फायदाही झाला. भजनातली गाणी, संगीत नाटकातली गाणी, नमनातले प्रवेश, गावातल्या जुन्या लोकांच्या जगण्यातले गमतीदार किस्से, मजेदार लहेजा असणारी स्थानिक भाषा अशा अनेक प्रकारांतून कोकणातला कलाकार या काळात कला सादर करत राहिला.

रमेश कीर कला अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांच्या के. झेड. क्रिएटिव्ह ग्रुपने ‘दिव्यांग’ या व्यावसायिक वेबसीरिजची निर्मिती केली. त्यांना जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीरिजमधला आशय-विषयही कोकणातलाच आहे.याच ‘के. झेड.’ टीम ने ‘कोकनातल्या झाकन्या’ ही कोकणातली पहिली वेबसीरिज जगभर पोहोचवली. समर्थ कृपा प्रॉडक्शनने ‘अक्रित झो’ या वेबसीरिजची निर्मिती केली. कोकणातल्या वाड्यांमधील्या गमती, इरसाल पात्र आणि भाषिक विनोदांनी भरलेली ही सीरिज सामाजिक प्रश्नांवरही प्रकाश टाकते.गुहागरमधील ‘कोकणी कार्टी’ ही वेबसीरिजही स्थानिक पातळीवर गंमतीदार किस्से लोकांपर्यंत पोहोचवत कोकणी रसिकांच्या पसंतीला उतरली. ‘वीकेंड कॉफी मराठी’ प्रोडक्शन निर्मित ‘वस्तीची एसटी’ ही सुद्धा एक नॅरेटिव्ह शार्टफिल्म या काळात निर्माण झाली. शाहीर विकास लांबोरे यांच्या लेखणीतून अवतरलेली ही कलाकृती आश्वासक होती.नमन ही अत्यंत जुनी आणि पुरातन काळाचा वास आणि सहवास असणारी कला. या कलेची कथा आणि व्यथा याविषयी बरंच काही बोलता येईल़; पण याच मानसिकतेतून चक्क तालुक्यातील चरवेली गावाने पेटारा लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटाचे दिग्दर्शन रोहित नागले यांने केले. या लघुपटाला सात इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले.

येथील युवा कलाकार नकुल गोविंद नाडकर्णी याने बालपणी शालेय जीवनात अनावधानाने घडलेला घटनेचा वेध घेणारा सार्थक हा लघुपट तयार केला. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी हा लघुपट पाहिला. युवा कलाकार अजिंक्य महादेव केसरकर दिग्दर्शित व निर्मित अल्बम हा लघुपट तयार केला. स्प्रौटिंग स्पीड इंटरनॅशनल २०२० महोत्सवात निवड आणि द्वितीय दिग्दर्शनाचे बक्षिस मिळाले तर कोचिन इंटरनॅशनल अॅवॉर्ड प्राप्त झाला. लेखक दुर्गेश आखाडे यांनी भारतातील पहिल श्री साईमंदिर यावर माहितीपट तयार केला. राजेश गोसावी यांनी कोरोना योद्धा या लघुपटासह पर्यटनावर१५ ते १६ माहितीपट तयार केले. युवा दिग्दर्शक ओमकार उर्फ बंटी पाटील याने कोरोनाच्या कालावधीत नवी सुरवात हा लघुपट केला. रंगकर्मी अमोल रेडीज यांनी मस्तीसे मिस्टेक, मोबाईल-मोबाईल, पुडी, राक्षस, आदी शार्टफिल्म तयार केल्या.

मिऱ्या गावाचा माहितीपट

येथील मिऱ्या गावची सुकन्या चित्रपट-दिग्दर्शिका रेणू सावंत हिने मिऱ्या येथे राहून चित्रपट व माहितीपट चित्रित करून दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवली असून, पुन्हा एकदा ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड आर्टस् बाफ्ताने यावर्षी निवडलेल्या भारतीय दहा प्रतिभावंतांमध्ये स्थान मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT