extra interest received from money lending in ratnagiri police arrest in case
extra interest received from money lending in ratnagiri police arrest in case 
कोकण

दामदुप्पट व्याज आकरणाऱ्या सावकारावर छापा ; उरलेल्यांचे दणाणले धाबे

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : परवानाधारक सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारून वसुलीसाठी धमकी दिली जात असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने रत्नागिरी शहराजवळील एका सावकारावर छापा मारला. पाच तासाच्या झाडाझडतीमध्ये घरातून काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली असून त्याचे छाननीचे काम सुरू आहे. या घटनेनंतर व्याजी धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरी तालुक्‍यातील एका तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सावकारी कायद्यानुसार एका कुटुंबावर कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील सावकार रोहन शिर्के व लीना शिर्के यांच्याकडून तक्रारदाराने कर्ज घेतले होते. कर्ज घेताना त्यांनी व्याजाचे पैसे कट करून कर्ज दिले. शिर्के माझ्याकडून वार्षिक व्याज ९६ टक्के घेतात. तसेच ५ नोव्हेंबर २०२० रोजी घरी एकटाच असताना रात्री ११.४५ ला गुंडांना घेऊन रोहन शिर्के यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

शिर्के यांचा व्यवसाय परवाना रद्द करावा. तसेच जीविताला धोका झाल्यास संबंधितांना जबाबदार ठरवावे, असा अर्ज ६ नोव्हेंबरला आला होता. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांनी रत्नागिरी तालुक्‍याचे सहाय्यक निबंधक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक नियुक्त केले. त्या पथकाने ३० डिसेंबरला सकाळी शिर्के यांच्या निवासस्थानाची झडती घेतली.

या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे प्राप्त झालेली आहेत. त्याची छाननी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकारामुळे व्याजी धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ग्राहकांच्या पिळवणुकीला आळा बसण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे सावकारांकडून पैसे घेतलेल्यांना परतफेड करताना अडचणी निर्माण होत होत्या. 

एकूण ७२ सावकार परवानाधारक

जिल्ह्यात एकूण ७२ सावकार परवानाधारक असून त्यातील ५२ परवानाधारक रत्नागिरी तालुक्‍यात आहेत. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार शेतकऱ्यांकरता तारणी कर्ज ९ टक्के व विनातारणी कर्ज १२ टक्के तसेच शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना तारणी कर्ज १५ टक्के व विनातारणी १८ टक्के याप्रमाणे व्याजदर निश्‍चित केले आहेत. सावकारीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधिताचे नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक गार्डी यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT