extra salary received by 62 teachers in ratnagiri districtextra salary received by 62 teachers in ratnagiri district 
कोकण

प्राथमिक शिक्षकांचा मार्ग झाला मोकळा ; आगाऊ वेतनवाढ मिळणार

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : प्राथमिक शिक्षकांचे सलग तीन अत्युत्कृष्ट गोपनीय अभिलेख असतील तर एक आणि सलग पाच असतील तर दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात येत होत्या; मात्र ऑक्‍टोबर २००६ ते जुलै २००९ मधील प्रलंबित ठेवलेल्या वेतनवाढी तसेच रद्द केलेल्या वेतनवाढी मिळण्याचा प्राथमिक शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. यामुळे जिल्ह्यात ६२ प्राथमिक शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मिळणार आहे. ज्यांची वसुली केली आहे, त्यांना फरकासह रक्कम परत मिळणार आहे.    

सेवेतील कामाबद्दल शासकीय कर्मचाऱ्यांचे दरवर्षी गोपनीय अभिलेख वरिष्ठांकडून भरले जातात. शासननिर्णय ११ फेब्रुवारी १९७४ आणि २० जून १९८९ अन्वये सलग तीन अत्युत्कृष्ट गोपनीय अभिलेख असतील तर एक आणि सलग पाच असतील तर दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात येत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने अशा वेतनवाढी जाहीर केल्या. दरम्यान, ६वा वेतन आयोग लागू केल्यानंतर ऑक्‍टोबर २००६ ते जुलै २००९ मधील वेतनवाढी प्रलंबित ठेवल्या आणि २४ ऑगस्ट २०१७ च्या आदेशान्वये सदर आगाऊ वेतनवाढी देणे रद्द केले.

या अन्यायाविरुद्ध रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात याचिका  दाखल केली होती. खेडचे प्रभाकर मुरलीधर कोळेकर आणि अन्य असे ६२ विरुद्ध महाराष्ट्र शासन, रिट पिटिशन क्र. २९२२७/२०१९ याचिकेवर कोरोना कालावधीत २७ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायमूर्ती एन. आर. बोरकर आणि के. के. तातेड यांच्या घटनापीठाने वेतनवाढी बहाल करण्याचा आदेश दिला. याचिका कर्त्याच्यावतीने औरंगाबाद येथील ॲड. संदीप सोनटक्के यांनी काम पाहिले.

पीटिशनमध्ये सहभागी शिक्षकांना लाभ 

या निकालामुळे जिल्ह्यातील पीटिशनमध्ये सहभागी शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ज्यांची वसुली केली आहे त्यांना फरकासह रक्कम परत करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT