कोकण

चिपळूण आगारातून वारीसाठी जादा गाड्या

CD

चिपळूण आगारातून वारीसाठी जादा गाड्या

दीपक चव्हाण ः थेट गावातून पंढरपूर एसटी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी ‘विठूनामाचा जयघोष’ करत श्री श्रेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ग्रुप बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन चिपळूण आगाराचे प्रमुख दीपक चव्हाण यांनी केले आहे.
विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक प्रवासी खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीबरोबर पायी चालत जातात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. ४० पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात, या प्रवासातदेखील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीटदरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकऱ्यांसाठी विविध विभागांतून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाविक, प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासीसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT