A family banned daughter in law and her baby
A family banned daughter in law and her baby 
कोकण

बाळासह सुनेला कुटुंबीय नाकारते तेंव्हा....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी _ तीन महिन्यांच्या बाळासह नवी मुंबईतून सूनबाई सावंतवाडी तालुक्‍यातील एका गावात आली; पण घरच्यांनीच प्रवेश नाकारला. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. या माहितीला तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला आहे. 

पती सैन्यात आहे. ती कोरोनामुळे घाबरून गेली होती. त्यामुळे तिने नवी मुंबईहून तीन महिन्याच्या बाळासह गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची परवानगी घेऊन आपल्या सांगेली गावात आली. पती सैनिक असल्याने तिला सांगेली गावात सोडण्यासाठी पोलिस आले होते. कुटुंबीयांनी घरात घेतले नसल्याने तिला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथून ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. पती नसल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भीती वाटू लागली म्हणून तिने आपले घर गाठले; पण घरातील मंडळींनी तिला प्रवेश देण्यास नाकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

संबंधित महिला सांगेली गावात घरी आली; पण तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेतले नाही. तीन महिन्यांच्या बाळाला दूध तापवून देण्याचे देखील नाकारले. 
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT