Family Report Negative Who In Contact With Corona Positive Woman 
कोकण

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील "ते' कुटुंब निगेटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील विखारेगोठणे येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या महिलेच्या संपर्कातील कुटुंबातील चारहीजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह राजापूरवासीयांनी निःश्‍वास सोडला.

मुंबईतून कुटुंबासह विखारेगोठणे येथे आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे गत आठवड्यात निष्पन्न झाले. तालुक्‍यात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने साऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेसह तिच्या कुटुंबीयांना तातडीने रत्नागिरीला हलविण्यात आले तर, ज्या भागामध्ये ती महिला राहत होती त्या भागासह तीन कि. मी. चा परिसर प्रशासनाने तातडीने सील केला.

परिसर तातडीने निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असला तरी तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचा अहवाल नेमका कसा येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यांचा काल सायंकाळी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे राजापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT