Famous actor Aamir Khan with family come Sindhudurg district 
कोकण

अभिनेते अमिर खान कुटुंबासह सिंधुदुर्गात

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्रसिद्ध अभिनेते आमिर खान आज जिल्ह्यात अचानक दाखल झाले. ते, सहकुटुंब सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर दोन हेलिकॉप्टरने आले. येथून ते बंदोबस्तात कुडाळच्या दिशेने वाहनाने गेल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासमवेत पत्नी व मुलगी असून जिल्ह्यात चित्रीकरणासाठी आले असल्याचेही चर्चा आहे. ते, भोगवे येथे काही दिवस वास्तव्य करणार असल्याचेही समजते; मात्र याबाबत सुरक्षा यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. 

येथील पोलिस परेड मैदानावर सकाळपासून दोन हेलीपॅड तयार करण्यात आली होती; मात्र कोण येणार हे समजत नव्हते. जिल्ह्यात मंत्री येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास एकापाठोपाठ एक अशी दोन हेलिकॉप्टर पोलिस परेड मैदानावर उतरली. यातील एका हेलिकॉप्टरमधून अभिनेता आमिर खान उतरल्याचे तेथील उपस्थितांनी पाहिल्यावर याबाबतची माहिती सर्वत्र पसरली. दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून त्यांची पत्नी व मुलगी उतरली. यावेळी कडक बंदोबस्त होता. पोलिस सुरक्षेसह खासगी सुरक्षाही होती. यानंतर एका वाहनाने खान कुटुंबिय कुडाळच्या दिशेने निघून गेले. 

पोलिस अधीक्षकांची घेतली भेट 
हेलीकॉप्टरमधून उतरल्यानंतर आमिर खानने कुटुंबियांसोबत जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. तेथे थोडावेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी कुडाळच्या दिशेने मार्गक्रमण केले. यावेळी ते दाभाडे यांना का भेटले, नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही. 

दौऱ्याचे कारण गुलदस्त्यात 
आमिर निघून गेल्यानंतर पोलिस परेड मैदानावर दोन्ही हेलीकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत तशीच उभी होती. तेथे जावून आमिर यांच्या यंत्रणेकडे चौकशी केली असता ते काहीच बोलत नव्हते. खासगी दौरा असून बाकी काही माहित नाही, असे त्यांनी सांगितले. उपस्थित पोलिस यंत्रणेकडे चौकशी केली असता त्यांनीही नेमके काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आमिर खान दाखल झाल्यानंतर अनेक चर्चांचे पेव फुटले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT