Farmer Dayanand Chaugule esakal
कोकण

भारत सरकारचं पेटंट मिळवणाऱ्या शेतकऱ्याकडून भाताच्या तब्बल 30 देशी वाणांचं संवर्धन; औषधीसह कॅल्शियमयुक्त वाणांचा समावेश

शेतामध्ये गादीवाफे तयार करून देशी वाणांच्या बियाण्यांची चौगुले यांनी रूजवात केली आहे.

राजेंद्र बाईत

भविष्यात भाताच्या देशी वाणांची ‘सीडबॅक’ विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सुमारे १० वर्षांपूर्वीपासून शेतकऱ्यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता.

राजापूर : मुंडगा आणि सरवट या भाताच्या जातींचे भारत सरकारचे पेटंट (Government of India Patent) मिळवणारे तालुक्यातील खरवते येथील प्रगतशील शेतकरी (Farmer) दयानंद चौगुले यांनी भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनावर भर दिला आहे. सुमारे ऐंशी ते नव्वद वर्षांपूर्वी लागवड होणाऱ्या आणि हद्दपार होत असलेल्या ३० प्रकारच्या देशी वाणांचे चौगुले यांनी संकलन केले आहे. त्यामध्ये कोकणासह महाराष्ट्र, गडचिरोली, दिल्ली, आसाम, उत्तरप्रदेशमध्ये घेण्याऱ्या औषधी गुणधर्म असलेल्या कॅल्शियमयुक्त वाणांचाही समावेश आहे.

शेतामध्ये गादीवाफे तयार करून देशी वाणांच्या बियाण्यांची चौगुले यांनी रूजवात केली आहे. त्या रोपांची लावणी करून त्या द्वारे उत्पादन घेतले जाते. भाताच्या देशी वाणांची बियाणी भविष्यात कोकणासह अन्य भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामधून कोकणासह परिसरामध्ये ‘हायब्रीड’ (संकरित) प्रजातींच्या वाणांच्या युगामध्ये पुन्हा एकदा देशी वाणांची रूजवात होणार आहे.

भविष्यात भाताच्या देशी वाणांची ‘सीडबॅक’ विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सुमारे १० वर्षांपूर्वीपासून शेतकऱ्यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता; मात्र, हायब्रीड वाणांच्या वापरामध्ये देशी वाण हद्दपार होऊ लागली आहेत. कमी खर्चामध्ये जादा उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शेतकऱ्यांकडून अधिक वापर होत असला तरीही आरोग्यदायी आणि विविध आजारांमध्ये औषधी म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या देशी वाणांचेही महत्त्व कमी झालेले नाही. या स्थितीमध्ये विविध औषधी गुणधर्म असलेल्या देशी वाणांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास चौगुले यांनी घेतला आहे.

संकरित वा हायब्रीड बियाण्यांचे उत्पादन जादा मिळत असले तरीही देशी वाण उत्पादनासह आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. त्यांना देवाघरचा दवाखाना म्हटले जाते. त्यामुळे देशी वाणांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला शेतकरी, मित्रपरिवार आणि कृषी विभागाचे आपणाला सकारात्मक सहकार्य मिळत आहे. भविष्यात भाताच्या देशी वाणांची ‘सीडबँक’ विकसित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

-दयानंद चौगुले, प्रगतशील शेतकरी

Farmer Dayanand Chaugule

संकलित केलेले देशी वाण

फुलेराधा, जस्मीन, काळा नमक, आजरा घनसाळ, मधुराज, टायचण, रक्तशाळी, बेला, वालय, सरवट, मुंडगा, बकासूळ, काळा जिरगा, इंद्रायणी, दिल्ली राईस, सोरटी, कुडा, गोविंद भोग, पटणी, आसाम बासमती, वाडाकोलम, भोगावती, बासमती, काळी गजरी, फुले समृद्धी, वारंगळ, काळे भात, गोरखपूर एस. बी. के., चंपाकळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT