farmer success story in guhagar kokan marathi news 
कोकण

'या' काकांनी केले कातळ जमीनीचे सोने....कसे ते वाचा...

मयूरेश पाटणकर

 गुहागर (रत्नागिरी ): वेळणेश्‍वरमधील गाडगीळ काकांनी अर्धा गुंठा कातळावर यावर्षी 40 किलो आले पिकविले. गेल्या वर्षी याच कातळावर 100 किलो हळद लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला होता. वर्षभरातील पालापाचोळा पसरवून त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, जीवामृत आणि अमृतपाणी वापरून गाडगीळ कातळावर शेतीचे प्रयोग यशस्वी करत आहेत. शेखर गाडगीळ हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती.

म्हणून ते वेळणेश्‍वरला सातत्याने येऊ लागले. वेळणेश्‍वरमधील दोन वाड्यांमध्ये रेन हार्वेस्टिंगचे काम केले. याच दरम्यान त्यांनी कातळ जमीन खरेदी केली. तेथेही रेन हार्वेस्टिंगमधून 13 लाख लिटर पाण्याचा संचय ते करत आहेत. कोकणातील विहिरी मे महिन्यात आटतात. म्हणून दोन कप्प्यांची रचना विहिरीत करून त्यामध्ये पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. गाडगीळ यांनी स्वखर्चाने काही ठिकाणी सौरदिवे दिले. गेली चार वर्षे कातळावर पालापाचोळा टाकून त्यात कृषी उत्पन्न मिळते का, असा प्रयोग ते करू लागले. पालापाचोळ्यात शेणखत, गांडूळ खत टाकले. जीवामृत, अमृतपाणी शिंपले. गेल्या वर्षी 200 रोपे लावून अर्ध्या गुंठयात 100 किलो ओल्या हळदीचे व 25 किलो कंदाचे उत्पादन घेतले. यावर्षी आल्याची लागवड केली. 

हेही वाचा- मुख्यमंत्री सिंधुदुर्गला कोणती देणार भेट ...? वाचा....

नियमितपणे जीवामृतचा डोस 
बाजारात उपलब्ध असलेले आले त्यांनी घेतले. 1.5 किलो आल्यापासून रोपे तयार केली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कातळावरील पालापाचोळ्याच्या थरावर लागवड केली. गांडूळ खताचा वापर केला. नियमितपणे जीवामृतचा डोस दिला. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाणी द्यावे लागले नाही; मात्र डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाणी शिंपले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढणी केली असता 40 किलो आल्याचे उत्पादन झाले. हळदीनंतर कातळावरील हा प्रयोगही सफल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT