Farmers Agitation Against Tilari Canal Department Officers
Farmers Agitation Against Tilari Canal Department Officers  
कोकण

तिलारी कालवा विभागाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराओ 

सकाळवृत्तसेवा

साटेली भेडशी ( सिंधुदुर्ग ) - तिलारीच्या गोव्याकडे जाणाऱ्या उजव्या कालव्यात परमे येथे दरड कोसळल्याने कालव्याचे पाणी बंद आहे. त्यामुळे घोटगेतील शेतकऱ्यांनी तिलारी कालवा विभागाच्या कोनाळकट्टा येथील अधिकाऱ्याला घेराओ घातला. त्यानंतर दोन दिवसात घोटगे पंचक्रोशीला पाणी देण्याचे आश्‍वासन कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. 
नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी पाणी सोडले नसल्याने शेती बागायती करपण्याच्या मार्गावर आहे, पाण्याची मागणी करणारे पत्र देऊनही आपले मागणीपत्र आलेच नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितल्याने शेतकरी संतप्त झाले.

तुमचे आम्हाला काही म्हणणे ऐकायचे नाही आम्हाला कार्यकारी अभियंता बी. जी.आजगेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून द्या. त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतरच आम्ही घेराओ मागे घेतो, असा पवित्रा घेतल्याने अखेर श्री. आजगेकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. कामाला आजपासून सुरवात करतो, दोन दिवसात घोटगे पंचक्रोशीला पाणी मिळेल असे आश्‍वासन श्री. आजगेकर यांनी दिल्याने घेराओ मागे घेण्यात आला. 

शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांच्यासह भरत दळवी, संतोष परब, संदीप दळवी, संतोष गवस,महेश दळवी, शंकर गवस, शंकर दळवी, श्रीराम दळवी, सहदेव दळवी, विद्यानंद दळवी, गुरुनाथ दळवी, बाळा दळवी आदी उपस्थित होते. 

वायदा आजचा; पण काम सुरूच नाही 
कालव्याचे काम आजपासून करावयाचे होते. त्यामुळे श्री. आजगेकर यांनी परमेतील खडी क्रशर कंपनीला आजपासून काम पूर्ण होईपर्यंत सेवा रस्त्याचा वापर न करण्याचे पत्र दिले होते. प्रत्यक्षात काम अद्याप सुरु झालेले नाही. ते उद्या सुरु होईल. त्यानंतर पाणी घोटगे पंचक्रोशीला मिळेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT